शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

साखरेची वाहिनी फुटल्याने २९ गावांचा पाणीपुरवठा ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 23:37 IST

रस्त्याचे काम करतांना लागला धक्का : पाच दिवस झाले निर्जळी

डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील २९ गावे, खेडोपाडयांना पाणी पुरवठा करणाऱ्या बाडापोखरण पाणी पुरवठा योजनेची साखरे जवळील मुख्य जलवाहिनी एका खाजगी ठेकेदाराने रस्त्याचे काम करीत असतांना फोडल्याने गत पाच दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. एवढे होऊनही पंचायत समिती, महाराष्ट्र जीवन प्रधिकरण किंवा जिल्हापरिषदेच्या पाणी पुरवठा विभाग तातडीने ती दुरुस्त न केल्याने प्रचंड हाल सुरु आहेत. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.

डहाणूच्या बंदरपट्टी भागातील वाणगांव, कतेरवाडी, बावडा, चिंचणी, तारापूर, धाकटी डहाणू व परिसरातील नागरिकांना वानगांव जवळील साखरे धरणातून बाडापोखरण प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा केले जाते. परंतु २००६ पासून येथील लोकांना दोन, चार, आठ दिवस आड पाणी पुरवठा केले जाते. त्यामुळे अधून मधून वीज पुरवठा खंडीत झाल्यास किंंवा रस्त्यांच्या नुतनीकरणाचे काम सुरू झाल्यास रस्त्याच्याकडेला असलेली जलवाहिनी फुटल्याने या परिसरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागते.

गेल्या रविवारी साखरे-वाणगांव रस्त्यावरील रस्त्याचे काम सुरु असतांना एका खाजगी ठेकेदाराने बाडापोखरणची मुख्य जलवाहिनी आठ ते दहा इंच फोडल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला. विशेष म्हणजे बाडापोखरणची जलवाहिनी अ‍े.सी. दर्जाची असल्याने या भागांत तिच्या दुरुस्तीचे साहित्य मिळत नाही. त्यामुळे जलवाहिनी दुरूस्त करतांना तीन दिवसांचा कालावधी झाला तरी अद्याप पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या जीवन प्रधिकारण, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष न दिल्याने पाणी पुरवठा केंव्हा सुरू होईल ते सांगता येत नाही.दरम्यान या पूर्वी तानसी धूमकेत येथेही रस्त्याच्या ठेकेदाराने काम करतांना जलवाहिनी फोडली होती, मात्र ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नाही.

साखरे येथे जलवाहिनी दुरूस्तीचे काम युध्द पातळीवर सुरू असून आज संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल. - आर. ए. पाटील, उप अभियंता, डहाणू जिल्हा परिषद, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Waterपाणी