शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूच्या बाजारात सुक्या बोंबलाचा दुष्काळ

By admin | Updated: July 3, 2017 05:51 IST

सागराशी झूंज देऊन रात्र दिवस कष्ट करणाऱ्या डहाणू ते झाई पर्यंतच्या हजारो मच्छिमारांना गेल्या वर्षभरात समुद्रात अनेक फेऱ्या मारूनही

शौकत शेख/लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : सागराशी झूंज देऊन रात्र दिवस कष्ट करणाऱ्या डहाणू ते झाई पर्यंतच्या हजारो मच्छिमारांना गेल्या वर्षभरात समुद्रात अनेक फेऱ्या मारूनही पूरेशा प्रमाणात मासे न मिळाल्याने त्यांच्यावर कर्ज बाजारी होण्याची पाळी आली आहे. त्यातच मच्छिमारांना हमखास वैभव मिळवून देणाऱ्या बोंबिलाची मासेमारी अत्यल्प प्रमाणात झाल्याने सध्या चिंचणी डहाणू ते झाई पर्यंतच्या मासळी बाजारातून सूका बोंबिल गायब झाल्याने गोर-गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांची पंचाईत झाली आहे.दरम्यान दिव, वेरावळ, तसेच कच्छ, सौराष्ट्र बंदरातून मोठया प्रमाणात डहाणूत सूके बोंबिल येत आहे. डहाणूच्या बोंबिलाच्या तुलनेत प्रति चारशे रूपये किलो विक्री होणाऱ्या या बोंबिलाला सध्या मागणी वाढत आहे. मुंबई महानगरापासून केवळ १२५ कि.मी. अंतरावर डहाणू हे नावाजलेले व प्रगतशिल बंदर आहे. येथील चिंचणी पासून ते झाई पर्यंतच्या किनारपट्टीवर हजारोच्या संख्येने राहणाऱ्या मच्छिमारांचा मासेमारी हा एकमेव व्यवसाय असून या भागांत सुमारे सहाशे ते सातशे लहान मोठया बोटी कव, वगरा व डालदा या तीन पध्दतीने प्रामुख्याने मासेमारी करीत असतात.विशेष म्हणजे मासेमारीच्या हंगामात घोळ, दाढा, शिवंड, सरंगा, सुरमई इत्यादी मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाची असलेली मासळी या भागात सापडते. शिवाय आॅक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा बोंबिलाचा मासेमारीचा हंगाम असतो. येथील सूक्या बोंबिलाला, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, अमरावती इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणात मागणी असल्याने येथील मच्छिमारांचे संपूर्ण कुटुंब तीन महिने रात्रदिवस मेहनत करीत असतात.शिवाय शासनाचे मच्छिमारांप्रति असलेले उदासीन धोरण इत्यादी करणांमुळे मासेमारी व्यवसाय संपूष्टात येण्याची चिन्हे दिसत आहे. वर्षभरात महागडे मासे तर सोडा पूरेशा प्रमाणात बोबिलाची ही मासेमारी न झाल्याने मच्छिमार अडचणीत आहे.