शौकत शेख, डहाणूतालुक्यात आरोग्य सुविधांचा बोजवारा उडालेला असतानाच त्यामध्ये अधिक भर म्हणून रुग्णांना पुढील उपचारासाठी तत्काळ अन्य रुग्णालयात पोहोचविणाऱ्या रुग्णावाहिकांचे चालक जिल्हा परिषद अध्यक्ष, सीईओ तसेच विविध समितीचे सभापती यांच्या सेवेत असल्याने तालुक्यातील रुग्णवाहिका शोभेचे बाहुले ठरल्या आहेत. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून सामान्य रुग्णांमध्ये तसेच त्यांच्या नातेवाइकांमध्ये रोष आहे. चिंचणी, कासा, सायवन, आशागड, गंजाड, आंबेसरी, धुंदलवाडी या प्राथमिक आरोग्य केंद्रांत सोयीसुविधांची कमतरता असली तरी येथील दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी दवाखान्यात पोहोचण्यासाठी या रुग्णवाहिका महत्त्वाचा आधार होत्या पण तो ही या खाबूंनी हिरवल्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे .साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यामध्ये ९ प्राथमिक आरोग्यकेंद्रे, ६५ उपकेंदे्र, तर २ आयुर्वेदिक दवाखाने आणि ३ आरोग्य पथके आहेत. कासा आणि डहाणू येथे ३ उपजिल्हा रुग्णालये तर वाणगाव येथे ग्रामीण रुग्णालय आहे. असे असूनही येथील आदिवासी रुग्णांना सिटीस्कॅन, रक्तपुरवठा, सोनोग्राफीसाठी गुजरात राज्यातील रुग्णालयावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
डहाणूत रुग्णवाहिका वाऱ्यावर
By admin | Updated: August 16, 2015 23:17 IST