शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पेयजलाच्या विहिरीला लागले गढूळ पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 00:07 IST

शहापूर तालुक्याच्या चारही बाजूने पाणीटंचाई गंभीर बनते आहे.

- जनार्दन भेरेभातसानगर : शहापूर तालुक्याच्या चारही बाजूने पाणीटंचाई गंभीर बनते आहे. भातसा, तानसा, वैतरणा या मोठ्या जलाशयांच्या परिसरात पाणीटंचाईमुळे आता गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पिवळी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेले गाव म्हणजे खोर. या गावात जाताना दुचाकीचालकाला रस्ता शोधावा लागतो आहे. अतिशय खराब झालेल्या या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण. गावात असणाऱ्या विहिरींमध्ये पाणी नाही. एवढेच नव्हे तर गावात पाण्याची सोय व्हावी, म्हणून जो हौद खोदायला घेतला आहे, त्यात गढूळ पाणी लागले आहे. हेच पाणी गावकरी पिण्यासाठी वापरत आहेत. गावातील विहिरीला लागून असलेला तलावही कोरडा झाल्याने पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.६० ते ६५ घरे असणाºया या गावाची लोकसंख्या सव्वाशेच्या आसपास आहे. माहुलीच्या पायथ्याशी हे गाव आहे. पहिल्याच पावसात या गावाची पाणीटंचाई मिटते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत गावातील नागरिकांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे वनीता बच्चू चौधरी यांनी सांगितले.सध्या गावात प्यायला पाणी नसल्याने जी विहीर बांधायला घेतली आहे, त्या विहिरीतील सिमेंटमिश्रित पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करत असल्याचेही वनीता चौधरी सांगतात.या गावात अनेक वर्षांपूर्वी रस्ता झाला होता. मात्र, त्यानंतर रस्त्याची अवस्था वाईट असून दुचाकी चालवताना कसरत करावी लागते.>गावात प्यायला पाणी नसल्याने नागरिक दूरवरून पाणी आणत आहेत. तर, बºयाचवेळा लोक नवीन बांधकाम सुरू असलेल्या विहिरीतील गढूळ पाणी पिण्यासाठी वापरतात.- ढवळू भिका, ग्रामस्थ खोर>आमच्याकडे टँकरने पाणी पुरवण्याचा प्रस्ताव आल्यास पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल.- एम.बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग