शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

ड्रेजरची रेल्वे पुलाला धडक; ११ जणांना ताब्यात घेतले, सिमेंटचे दोन ब्लॉक तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:32 IST

रेती उत्खनन करणा-या ड्रेजरने वसई खाडीवरील जुन्या रेल्वे पूलाला धडक दिल्याने पूलाचे नुकसान झाले. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ड्रेजरसह ११ जणांना ताब्यात घेतले आहे.

वसई : रेती उत्खनन करणा-या ड्रेजरने वसई खाडीवरील जुन्या रेल्वे पूलाला धडक दिल्याने पूलाचे नुकसान झाले. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ड्रेजरसह ११ जणांना ताब्यात घेतले आहे.वसई खाडीत रेती उत्खनन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ड्रेजरने रेती उत्खनन केले जाते. सोमवारी रात्री एक ड्रेजर रेती उत्खनन करण्यासाठी रेल्वे पूलाखालून जात असताना पूलाच्या पोलला धडकून अडकला. भरती सुरु असताना ड्रेजर चालकाने ड्रेजर पूलाखालून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ड्रेजर पूलाखाली अडकला गेला. त्यामुळे रेल्वे पूलाचे सिमेंटचे ब्लॉक तुटून पडले. त्यामुळे दोन पूलाचे नुकसान झाले. याची माहिती मिळताच बंदर अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री ड्रेजर पूलाखालून काढून जप्त करण्यात आला.सहाय्यक बंदर निरीक्षक विश्वास कांबळे यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ड्रेजर जप्त केला. तसेच ड्रेजरवर असलेल्या अकरा खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान, वसई खाडीतून रेती उत्खनन करण्यास मनाई करण्यात यावी अशी मागणी पाचूबंदर, कोळीवाडाकरांची मागणी आहे. जुना रे्ल्वे पूल वाहतूकीसाठी बंद असल्याने ड्रेजरने धडक दिल्याने कोणताही परिणाम झाला नाही. मात्र, या पूलाला समांतर दुसरा पूल असून त्यावरून पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरु असते. जर त्यास धडक दिली असती तर मोठा अनर्थ होऊ शकला असता.कोर्टामध्ये याचिकारेती उत्खननामुळे पावसाळ््यात गावात पाणी शिरते तरीही पूलाखालून रेती उत्खनन केले जात असल्याने पूलाला धोका होऊ शकतो, अशीही तक्रार कोळी युवा शक्तीने केली होती. तसेच मुंबई हायकोर्टात जनहित याचिकाही दाखल केली होती. मात्र, जिल्हाधिकाºयांनी रेती उत्खननास परवानगी दिली गेल्याने सध्या ड्रेजरच्या साहय्याने रेती उत्खनन केले जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार