शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या तपासणीची डहाणूत धडक मोहीम

By admin | Updated: April 9, 2017 00:56 IST

डहाणू तालुक्ऱ्यातील ग्रामीण व शहरी अशा सर्व रुग्णालयं आणि दवाखान्यांच्या तपासणीच्या मोहिमेला प्रारंभ झाला आहे. या भेटी दरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटीं संदर्भात दैनंदिन

- अनिरुद्ध पाटील,  बोर्डी डहाणू तालुक्ऱ्यातील ग्रामीण व शहरी अशा सर्व रुग्णालयं आणि दवाखान्यांच्या तपासणीच्या मोहिमेला प्रारंभ झाला आहे. या भेटी दरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटीं संदर्भात दैनंदिन अहवाल वरिष्ठपातळीवर पाठविण्यात येत असून आजतागायत या प्रकरणी एकाविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बोगस डॉक्टरांविरोधी कारवाई करण्यासाठी सर्व दवाखाने आणि रुग्णालयांच्या तपासणीची धडक मोहीम १५ मार्च ते १५ एप्रिल या काळात सुरू झाली आहे. तालुक्यात ग्रामीण व शहरी अशा दोन भागात तपासणीचे काम सुरू आहे. या पैकी ग्रामीण भागात येणाऱ्या आशागड, सायवण, घोलवड, गंजाड, चंद्रनगर, चिंचणी, धुंदलवाडी, तवा आणि ऐना आदि नऊ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सुमारे ७० पैकी निम्म्या खाजगी दवाखान्यांची तपासणी आजतागायत पार पडली आहे. चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत धाकटी डहाणू येथील संजय भामरे यांनी इलेक्ट्रोपॅथीची पदवी असतांना डॉक्टर नावाचा उल्लेख केल्याने त्यांच्यावर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्ऱ्यात आला आहे. या धडक कारवाई करणाऱ्या टीममध्ये तालुका आरोग्य अधिकारी अभिजीत चव्हाण यांच्यासह उपजिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या प्रतिंनिधींचा समावेश आहे. पूर्वसूचना न देता ही धडक मोहीम राबविली जात असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. डॉक्टरांची पदवी आणि परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, कार्यरत परिचारिकांची पदवी किंवा पदविका महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी, दवाखान्यातील सोयी-सुविधांबाबत खातरजमा केली जात आहे. डॉक्टरांकडून योग्य पद्धतीची औषधे देण्यात येतात का ही बाब तपासण्यात येत असल्याने शासकीय रुग्णालयातील औषधसाठा खाजगीत विकणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे. दरम्यान दैनंदिन तपासणी अहवाल वरिष्ठ कार्यालयांकडे पाठविण्यात येतो. तालुक्यात गैरप्रकार आढळल्यास संबंधीताविरोधी नागरिकांनी तत्काळ तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘‘ एक महिन्याच्या कलावधीत सुमारे ७० दवाखान्ऱ्यांची तपासणी करण्ऱ्यात येणार असून निम्मे काम झाले आहे. दरम्यान आतापर्यंत एका विरोधात पोलिसात तक्र ार नोंदविण्यात आली आहे.’’ - अभिजीत चव्हाण (तालुका आरोग्य अधिकारी डहाणू)