शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत चिकू आपत्ती निवारण बैठक संपन्न, बागायतदार शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 05:40 IST

बोर्डी: चिकू उत्पादक संघाच्यावतीने चिकू आपत्ती निवारण बैठक शुक्र वारी कंक्राडी येथे पार पडली. या वेळी उपस्थित बागायतदारांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्याच्या निर्णयाला शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद या कार्यक्र मात संमती देण्यात आली.पालघर जिल्ह्यात साडेसातहजार हेक्टेर चिकू बागायतीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेचारहजार डहाणू तालुक्याचे आहे. मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी, विविध ...

बोर्डी: चिकू उत्पादक संघाच्यावतीने चिकू आपत्ती निवारण बैठक शुक्र वारी कंक्राडी येथे पार पडली. या वेळी उपस्थित बागायतदारांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्याच्या निर्णयाला शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद या कार्यक्र मात संमती देण्यात आली.पालघर जिल्ह्यात साडेसातहजार हेक्टेर चिकू बागायतीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेचारहजार डहाणू तालुक्याचे आहे. मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी, विविध रोगाचा प्रादुर्भाव आणि हमी भाव आदीच्या अभावामुळे बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हवामानावर आधारित फळपीक विमा चिकू फळाला लागू करण्यात आला आहे. मात्र त्यातील काही अटींमुळे लाभ मिळताना अडचण येत असूनही शासनाकडून मदतीचा हात दिला जात नाही.तथापी सर्वसामान्य बागायतदारांच्या हिताकरीता शुक्र वार, ८ सप्टेंबर रोजी चिकू आपत्ती निवारण बैठक कंक्र ाडी येथे घेण्यात आली.या वेळी जिल्हा कृषी अधिक्षक श्री. आर.जी.पाटील, कर्जत भात संशोधन केंद्राचे चव्हाण, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वनस्पती व कीडरोग शास्त्रज्ञ डॉ. दळवी तसेच पालघर कृषी विभागाचे वनस्पती कीडरोग शास्त्रज्ञ डॉ. मालसे, डॉ. गंगावणे व डॉ. धाने या तज्ञांप्रमाणेच जिल्ह्यातील बागायतदार उपस्थित होते.दुपारच्या सत्रातील सभेला सुरु वात होण्यापूर्वी तज्ज्ञमंडळींसह विनायक बारी, यज्ञेश सावे, देवेंद्र राऊत, अनिल पाटील या बागायतदारांनी तालुक्यातील सरावली, सावटा, जामशेत, कंक्र ाडी या भागातील चिकू बागायतींची पाहणी केली. या वेळी रोगग्रस्त चिकू बागेची स्थिती खूपच भयवाह असल्याचे दिसून आले. सापूर बच्चूभाई बारी यांच्या सरावली येथल्या बागेत एकेका झाडाखाली १०० किलो फळगळती झाल्याचे शेतीनिष्ठ पुरस्कार विजेता शेतकरी देवेंद्र राऊत यांनी सांगितले.या वर्षी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन चिकू बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. बागायती वाचवायची असल्यास शेतकºयांना नुकसानीची भरपाई मिळावी या करीता मुख्यमंत्र्यांसह कृषी आणि महसूल विभागाकडे निवेदन दिले आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.- विनायक बारी(अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ)