- अरिफ पटेलमनोर : पालघर जिल्ह्यातील मासवण गाव सेनेचे आम रवींद्र फाटक यांनी दत्तक घेतले मात्र गेल्या दोन वर्षा पासून कोणतेही काम न केल्याने तेथील ग्रामस्थ त्यांच्याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहे गाजर दाखवणाऱ्या आमदारांच्या पक्षाचे आगामी निवडणुकीत काय होणार ?नांदगाव तर्फे मनोर गाव महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी २०१६ ला दत्तक घेतले होते त्याच्या पाठोपाठ २०१७ ला सेनेचे आम. रवींद्र फाटक यांनी मासवण गाव दत्तक घेतले. तिथे ग्रामसभेत येऊन शेकडो लोकांच्या समक्ष रस्ते, आरोग्य, शिक्षण, विज,तसेच कातकरी वस्थी सुधारणे, समाज मंदिर, शाळे ची इमारत असे अनेक कामे करण्याचे आश्वासने दिलीत. परंतु गेल्या दोन वर्षा पासून त्या गावात फिरकले सुद्धा नाही भाजपचे ठाकूर व सेनेचे फाटक या दोन्ही आमदारांनी पालघर जिल्हातील अतिदुर्गम भागात येणारे नांदगाव तर्फे मनोर, मासवण हद्दीतील गोर गरीब आदिवासी व इतर समाजातील लोकांना विकासाचे गाजर दाखविले आहे. मात्र येणाºया निवडणुकीत त्यांना मतदार राजा ठेंगा दाखविल. मासवण ग्रामपंचयती तर्फे फाटक यांना कोणकोणती कामे करायची आहेत याचा सर्व्हे करून अराखडा तयार करून दिला होता. तरी सुद्धा दोन वर्षात कुठलेही काम झाले नाही.हे गाव मी आमदार म्हणून पालघरच्या नगराध्यक्षांच्या शिफारशीवरून दत्तक घेतले होते. मात्र पहाणीअंती त्याचा भरपूर विकास आधीच झाला आहे हे लक्षात आल्यावर मी दुसरे गाव दत्तक घेतले त्यामुळे येथे कामे करण्याचा प्रश्नच नव्हता. -शिवसेना आमदार रवींद्र फाटकया गावाच्या विकासासाठी स्वर्गीय चिंतामण वनगा यांनी १५ लाख तर राज्यमंत्री दादा भूसे यांनी २० लाखाचा निधी विकासकामांसाठी दिला. मात्र त्यात अन्य कुणाचे योगदान लाभलेले नाही. हा निधी आम्ही आमच्या हिंमतीवर आणला. -उत्तम पिंपळे, नगराध्यक्ष पालघरगाव दत्तक घेऊन फाटक यांनी काहीच कामे केली नाही मात्र ग्रामपंचायत व उत्तम पिंपळे नगराध्यक्ष यांच्या प्रयत्ना ने गावा मध्य रस्ते,समाज मंदिर, सोलर ऊर्जेचे दिवे, वॉल कंपाउंड असे ७० ते ९० लाख रुपयांची कामे केलीत. आम्ही अनेक वेळा त्यांच्याकडे कामाचा पाठ पुरवठा करून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले. -संजय पवार, मासवण ग्रामपंचायतीचे सरपंच
दत्तक गावी आमदारांची कामे शून्य?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 05:29 IST