शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पेंडक्याचीवाडीला पाणीटँकर मिळेना

By admin | Updated: March 12, 2017 02:13 IST

धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पेंडक्याचीवाडी येथील आदिवासी बांधवाना डिसेंबरपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना

- रविंद्र साळवे, मोखाडा

धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पेंडक्याचीवाडी येथील आदिवासी बांधवाना डिसेंबरपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना देखील जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अजूनपर्यत टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही.चारशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावपाड्याला दरवर्षीच पाणीटंचाई निर्माण होत असते. यामुळे येथील भूमीपुत्राना डिसेंबरपासून घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. येथील महिला पुरुषांना विहिरीवरच मुक्काम ठोकून रात्रभर नंबर लाऊन विहिरीत उतरून पाणी भरावे लागते. टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मोखाडा तहसील कार्यलयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेला आहे परंतु अद्याप तो मंजूर झालेला नाही. उन्हाळाच्या शेतीच्या कामात गुंतलेल्या बांधवाना हातचे काम टाकून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने कुणी टँकर देता का टँकर अशी म्हणण्याची वेळ या बांधवा वर येऊन ठेपली आहे. शासन निर्णयानुसार पाणीपुरवठ्याचा विषय जीवनावश्यक बाब असल्याने २४ तासांत त्याबाबतचा निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र, शासनाच्या उदासिन धोरणामुळे तारीख पे तारीख अशीच टॅँकर मागणीच्या प्रस्तावाची अवस्था झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना एखादा पाणी बळी गेल्यावर जाग येईल का? (वार्ताहर)जलयुक्त शिवार योजनेत ही वाडी कधी समाविष्ट करणार? पाणी टंचाईग्रस्त झाल्याने दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करावा लागणाऱ्या गावपाड्यांची जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत निवड करायची आहे. त्यामुळे या ठिकाणी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ अशा विविध योजना राबवून येथील भूजल पातळी वाढवूना पाणी टंचाई आटोक्यात आणता येईल. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पेंडक्याचीवाडीत गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून त्याला जलयुक्त शिवार योजनेमध्ये समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे तात्काळ हे गाव पाडे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करण्यात यावीत अशी मागणी रामदास बरफ यांनी केली आहे. ती जिल्हाधिकारी कधी पूर्ण करणार?