शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

घर घेताना फसू नका, नगररचनाकडून इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:46 IST

अधिकृत शिक्का : अनधिकृत कामे

वसई : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम व्यावसायिकांनी वसई विरार शहरात हजारो अनधिकृत इमारती बांधल्या आहेत. आता महानगरपालिकेची अधिकृत बांधकाम परवानगी घेऊन अनधिकृत इमारती बांधल्या जात असल्याचे उघड झाले आहे.

महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर बांधकाम परवानगी दिल्याची यादी प्रसिध्द केल्याने संबंधित इमारत जरी अधिकृत असली तरी प्रत्यक्षात त्यात वाढीव बांधकामे केली जात आहेत. ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी घरे घेण्यापुर्वी नगररचना विभागात संपर्क करावा, असे आवाहन वसई-विरार महानगरपालिकेने केले आहे.

शहरात हजारो अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यात सर्वसामान्य नागरिकांची मोठी फसवणूक झालेली आहे. बांधकाम व्यावसायिक बनावट कागदपत्रे, बनावट बांधकाम परवागन्या दाखवून ग्राहकांना इमारती मधील घरे विकत होती. एकदा विक्री झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक हात वर करून पसार होतात अन् रहिवाशांना भोग भोगावे लागतात. त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही आणि परिणामी नळ जोडणी मिळत नाही. तसेच शास्तीचा भुर्दडही भरावा लागत आहे. त्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर बाधकाम परवागनी टाकण्यात आली आहे. मात्र विकासक बांधकाम परवानगी घेऊनही वाढीव अनधिकृत बांधकामे करत असल्याचे उघड झाले आहे. हे रोखण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलेले आहे.संकेतस्थळावरून मिळू शकेल माहितीनागरिक संकेतस्थळावर पडताळणीसाठी जात नाहीत. त्यांना भूमापन क्र मांक, बांधकाम परवागनी यांची माहिती नसते. ज्यांना माहिती असते त्यांची देखील यामुळे फसगत होत असते. त्यामुळे मागणी केल्यास महापालिकेना अनधिकृत इमारतीचा तपशील, ती बांधणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची नावे संकेतस्थळावर प्रसिध्द करणार आहे. यामुळे नागरिकांना संबंधित प्रकल्प अनधिकृत आहेत का ते सहज कळू शकणार आहे. 

नागरिकांनी पालिकेत चौकशी करावी. त्यांनी वसई विरार शहरात घरे घेण्यापर्ू्वी संबंधित प्रकल्पाची कागदपत्रे पडताळणीसाठी नगररचना कार्यालयात भेट देऊन करावी- संजय जगताप,नगररचना उपसंचालक,वसई-विरार महापालिका