शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

विस्कटलेली आर्थिक घडी दिवाळीने सावरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 00:05 IST

व्यापाऱ्यांमध्ये थोडी खुशी थोडा गम : गतवर्षीपेक्षा घट

 पंकज राऊतलोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडोऊनबरोबरच अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीने मागील ८ महिन्यांपासून काही मोजके व्यावसायिक सोडले तर उर्वरित सर्व व्यावसायिकांची आणि शेतकऱ्यांची आर्थिक घडी व गणिते अक्षरशः विस्कटली होती. मात्र दिवाळीमुळे ती काहीशा प्रमाणात सावरल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी काही व्यापाऱ्यांमध्ये थोडी खुशी थोडा गम दिसत आहे.

कोरोनाच्या प्रकोपामुळे बोईसरसह परिसरातील बहुसंख्य व्यवहार व व्यवसाय ठप्प झाल्याने नोकरदारांपासून रिक्षाचालकांसह लहानमोठ्या सर्व व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. सुरुवातीला शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसून एकूण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याने आर्थिक घडी विस्कळून गेली होती. तारापूरची औद्योगिक नगरीही सुरुवातीला ठप्प होऊन दैनंदिन व्यवहार थांबले होते. पालघर जिल्ह्यातील बाजारपेठांत अनेक महिने शुकशुकाट दिसत होता. मात्र दिवाळीमध्ये एकदम चैतन्य आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दिवाळीतील वेगवेगळ्या दिवसाचे महत्त्व जाणून ती साजरी करण्याकरिता सुगंधी उटणे, तेल, साबणापासून आकाशकंदील, उंची कपडे, मिठाई व पारंपरिक गोडधोड, दिव्यांची तोरणे, नक्षीदार पणत्या, रांगोळ्या, ग्रीटिंगकार्ड याबरोबरच सोने खरेदी आणि घरातील टी.व्ही., फ्रीझ, अगदी परिस्थितीनुरूप खरेदी करून दिवाळीचा सण वेगळ्या वातावरणात, साजरा करण्यात येतो, यंदा मात्र हा ट्रेंड थोडा बदलेला दिसला.

व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती. दुकानासमोर आकर्षक लायटिंग करून ग्राहकांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला गेला. सोन्याच्या दुकानांमध्ये काहीशी गर्दी दिसली. मिठाईच्या दुकानदारांना ऑर्डर होती, परंतु मागच्या वर्षापेक्षा जास्त व्यवसाय झाला नसल्याचे मिठाई विक्रेत्यांनी सांगितले. कापड विक्रेत्यांनी स्पर्धेमुळे कमी मार्जीनवर व्यवसाय केल्याचे सांगितले.

अनेक महिन्यांनी दिवाळीत बाजारपेठांत पुन्हा गर्दीपालघर जिल्ह्यातील बाजारपेठांत गेले अनेक महिने शुकशुकाट दिसत होता. मात्र दिवाळीमध्ये एकदम चैतन्य आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. कोरोनामुळे घाऊक विक्री ठप्प झाली होती. त्यातच या वर्षी महागाईबरोबरच आर्थिक मंदीचेही सावट होतेच. परंतु दिवाळीतील वेगवेगळ्या दिवसाचे महत्त्व जाणून त्यानुसार बाजारपेठा सजल्या होत्या आणि लोकांचीही खरेदीसाठी गर्दी दिसत होती.