शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात?

By admin | Updated: October 26, 2016 05:19 IST

महापालिकेकडून बिले वेळेवर निघत नसल्याचे कारण पुढे करीत गेल्या सहा-सात महिन्यांपासून वसई विरार पालिकेतील कंत्राटी कामगारांचे पगार उशिराने होऊ लागले

- शशी करपे,  वसर्ईमहापालिकेकडून बिले वेळेवर निघत नसल्याचे कारण पुढे करीत गेल्या सहा-सात महिन्यांपासून वसई विरार पालिकेतील कंत्राटी कामगारांचे पगार उशिराने होऊ लागले आहेत. आता दिवाळी तोंडावर असताना गेल्या महिन्याचा पगार अद्याप न मिळाल्याने कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे आहेत. तर बोनसबद्दल नेहमीप्रमाणे ठेकेदार काही बोलायलाच तयार नसल्याने जे हातात पडेल ते घेण्याची कामगारांची तयारी आहे.वसई-विरार महापालिकेने पाणीपुरवठा, उद्याने, बांधकाम, दिवाबत्ती, आरोग्य, साफसफाई, आस्थापना अशा विविध विभागांतील कामे कंत्राटी पद्धतीने दिली आहेत. यासाठी महापालिकेकडून अनेक कंत्राटदार नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कामांसाठी कंत्राटदारांनी कर्मचारी व कामगार नियुक्त केलेले असून त्याची संख्या चारशेच्या घरात आहे. मात्र या कर्मचारी व कामगारांचे मागील सहा-सात महिन्यांपासून पगार अनियमितपणे होत आहेत. काही विभागातील कर्मचाऱ्यांना तर गेल्या दोन महिन्यांपासून पगार दिले गेलेले नाहीत. आता ऐन दिवाळीच्या तोंडावरही कंत्राटदारांनी कर्मचारी-कामगारांना पगार देण्यास नाखुशी दर्शवून वेठीस धरल्याने या कर्मचारी-कामगारांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने आमची बिले थकवल्याचा दावा कंत्राटदारांनी केला आहे. तर महापालिकेने कर्मचारी-कामगारांचे पगार काढणे कंत्राटदारांचे काम आहे, असे सांगून पलटवार केला आहे.पालिकेकडून बिले वेळेत निघाली नाही तरी ठेकेदारांनीच वेळेत पगार दिले पाहिजेत असे बंधन पालिकेने घातले आहे. मात्र, ठेकेदार बिले निघत नसल्याचे कारण पुढे करीत कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देत नसल्याच्या तक्रारी आहेत. दिवाळी तोंडावर आली असताना ठेकेदारांनी २५ आॅक्टोबर उलटून गेल्यानंतरही पगार दिलेले नसल्याने कर्मचारी नाराज झाले आहेत. मध्यंतरी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे कारण सांगून आयुक्तांनी कंत्राटी कामगारांची संख्या कमी केली होती. त्यावेळी ठेकेदार प्रचंड घोटाळे करीत असल्याचे उजेडात आले होते. पण, धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठेकेदारांकडे संशयाने पाहिले जात होते, त्याच ठेकेदारांना पुन्हा ठेके दिले गेले आहेत. अनेक ठेक्यांमध्ये सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा थेट संंबंध असल्याचेही उजेडात आले आहे. मात्र, त्यांच्याकडूनच कामगारांची पिळवणूक होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, वर्षभर पिळवणूक करणारे ठेकेदार दिवाळीत बोनसच्या नावाखाली दोन-तीन हजार रुपये देऊन कर्मचाऱ्यांना वाटाण्याचा अक्षता लावतात. आता तर या महिन्यांचा पगार न देणाऱ्या ठेकेदारांकडून दिवाळी बोनसची अपेक्षा का धराची? असा सवाल कर्मचारी उपस्थित करु लागले आहेत. महापालिकेकडून सर्व कंत्राटदारांची बिले मंजूर करण्यात आलेली आहेत. ही बिले काढण्यासाठी महापालिकेच्या मुख्य व लेखा विभागाकडे पाठवण्यात आलेली आहेत. त्यामुळे पुढील कार्यवाही तो विभाग करीत आहे. बिले वेळेवर मिळाली नाही तरी कामगारांचे पगार नियमितपणे करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असते. - सदानंद सुर्वे, सहाय्यक आयुक्त, आस्थापना विभागकाही तांत्रिक कारणांमुळे बिले रखडली होती. दोन-तीन दिवसात ही बिले काढली जातील. केवळ तीन-चार कंत्राटदारांची बिले काढणे बाकी आहेत. मात्र कंत्राटदारांनी कर्मचारी-कामगारांचे पगार थकवणे चुकीचे आहे. कर्मचारी-कामगारांना पगार देता येतील इतक्या आवश्यकतेची बिले काढलेली आहेत.- प्रवीण वडगाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारीआरोग्य विाागात ही समस्या नाही. आम्ही आमच्या कर्मचारी-कामगारांचे पगार महिन्याच्या ७ ते १० तारखेपर्यंत देतो. - रविंद्र चव्हाण, ठेकेदारआम्ही आमच्या कर्मचारी-कामगारांचे पगार बुधवार-गुरुवारपर्यंत देणार आहोत. महापालिकेने आमची जानेवारीपर्यंतची बिले थकवल्याने आम्हाला कर्मचाऱ्यांचे पगार देता आलेले नाहीत. - अमित पाटील, ठेकेदार