शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

७ व्या वेतन आयोगापासून जि.प.कर्मचारी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:31 IST

तीव्र नाराजी : फटका कुणाला बसणार?

वाडा : मोठा गाजा वाजा करून जाहीर केलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या लाभापासून पालघर जिल्हा परिषदेचे कर्मचारी वंचित असून, मार्च महिन्याच्या पगारात सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची शक्यता मावळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे, याचा फटका लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना बसू शकतो.

केंद्र सरकारने १ जानेवारी 2016 पासून आपल्या कर्मचाऱ्यांंना सातवा वेतन आयोग लागू केल्यापासून राज्यातील कर्मचारी या आयोगाकडे डोळे लावून बसले होते .अखेर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने मार्च महिन्यात अधिसूचना जारी करून, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्राम सेवक, आरोग्य कर्मचारी व अन्य कर्मचारी यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन सातव्या आयोगाप्रमाणे अदा करण्याचे आदेश दिले. परंतु या अधिसूचने नंतर गेल्या महीनाभरात प्रशासकीय पातळीवर कोणतीही हालचाल झाली नाही, तसेच सातव्या आयोगाप्रमाने वेतन निछित करण्याचे कुठलेही प्रशिक्षण घेण्यात आले नाही, त्यामुळे कर्मचारी वर्गात संभ्रम निर्माण झाला असून, निदान जुन्याप्रमाणे मार्च महिन्याचे वेतन वेळेत अदा करण्याची अपेक्षा कर्मचारी करत आहेत.

त्यातच मागील आठवड्यात शासनाच्या कोषागार विभागाने जिल्हा परिषदेला पाठविलेल्या पत्रानुसार राज्याच्या पंचायत राज सेवार्थ प्रणालीमध्ये महाआयटी विभागाकडून दुरूस्ती करण्याचे काम सुरू असून, मार्च महिन्याचे वेतन सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे अदा करण्यात यावे असे आदेश दिले, एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यावर हे पत्र काढण्याची शासनाला जाग आल्यामुळे कर्मचाऱ्यांंमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, सातवा वेतन आयोग म्हणजे भिक नको पण कुत्र आवर असे म्हणण्याची वेळ कर्मचाºयांंवर आली आहे,सरकारकडे पैसाच नाही?निदान सहाव्या आयोगाप्रमाणे मार्च महिन्याचे वेतन वेळेवर अदा केले असते तर किमान कर्मचाºयांंची आर्थिक ओढाताण झाली नसती, शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांने सांगितले की, सातव्या आयोगाप्रमाणे वेतन अदा करायला सरकारकडे पैसाच नसल्याचे हे चिन्ह आहे.