शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक विभाजन मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:57 IST

कोकण विकास मंचच्या माध्यमातून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आणण्यासाठी निलेश सांबरे यांनी गुरुवारपासून आरंभिलेले उपोषण यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत

ठाणे : कोकण विकास मंचच्या माध्यमातून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आणण्यासाठी निलेश सांबरे यांनी गुरुवारपासून आरंभिलेले उपोषण यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेचे नवनियुक्त पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांनी सांबरे यांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांच्या समवेत पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. हा विषय कॅबिनेटमध्ये प्राधान्याने मांडण्याचे यावेळी ठरले. तसेच त्याबाबत आपण व दोन्ही मंत्री मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहोत, असेही फाटक यांनी लोकमतला सांगितले.जिल्हा बँकेचे विभाजन ही प्रक्रीया राज्यसरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्याद्वारे पार पाडली जाते. गेल्या ३ वर्षांपासून हा प्रश्न भिजत पडला आहे. ठाणे जिल्हा विभाजन विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर केल्यामुळे जिल्हा बँक व अन्य कार्यालयाचे विभाजन करण्यात आले नव्हते. पृथ्वीराज चव्हाण सरकार मावळते होते. त्यामुळे त्यानेही ते केले नाही व सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारनेही गेल्या तीन वर्षांत ते केलेले नाही.विष्णू सवरांसारखा भाजपचा जेष्ठ नेता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असतांनाही हा प्रश्न अनिर्णित राहिला आहे. त्यामुळेच हे उपोषणाचे अस्त्र उगारावे लागले आहे. अशी प्रतिक्रीया सांबरे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली आहे.जिल्हा बँकेच्या एका माजी अध्यक्षांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की, जिल्हा बँक विभाजनाचा प्रस्ताव राज्यशासन मंजूर करते व त्यानुसार विभाजन करून नवी जिल्हा बँक स्थापन करण्याची अनुमती रिझर्व्ह बँकेकडे मागते. त्यासोबत विद्यमान बँकेच्या शाखा, कर्मचारी, भांडवल, ठेवी, कर्जे, खातेदार हे कीती आहेत? व त्यांचे विभाजन कसे करण्याचे प्रस्तावित आहे, याचाही आराखडा सादर करते. त्यानुसार रिझर्व्ह बँक निर्णय घेत असते. परंतु राज्यशासन जोपर्यंत स्वत: विभाजनाचा प्रस्ताव सादर करीत नाही. तोपर्यंत रिझर्व्ह बँक काही करू शकत नाही, असे सांगितले. आता दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी या विषयात लक्ष घालून तो मुख्यमंत्र्यांकडे व कॅबिनेटमध्ये नेण्याचे ठरविल्यामुळे आता त्याची तड निश्चित लागेल अशी अशा पालघर जिल्हावासियांत निर्माण झाली आहे.खान्देश आणि विदर्भातील काही नवनिर्मित जिल्ह्यांसाठी पूर्वींच्या जिल्हा बँकांचे विभाजन करण्याचा निर्णयही असाच प्रलंबीत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता ठाण्यासोबत अन्य ज्या नव्या जिल्ह्यांसाठी नवी बँक अस्तित्वात आणणे बाकी आहे, त्यांचेही प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीला अजून २ वर्षे बाकी आहेत. त्यामुळे विभाजन प्रक्रीया आता सुरु केली तर वर्षभरात ती पूर्ण होईल आणि नवी बँक अस्तित्वात आणल्याचे श्रेय सत्ताधारी युतीला मिळू शकेल असाही एक विचार सत्ताधाºयांत आहे. कुणाच्या का प्रयत्नामुळे असो, पालघर जिल्ह्याला स्वतंत्र जिल्हा बँक एकदाची मिळो. अशी पालघरवासियांची इच्छा आहे.

टॅग्स :GovernmentसरकारthaneठाणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस