शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारच्या शिवाजी गार्डनची दूरवस्था, बच्चेकंपनी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:07 IST

जव्हार नगरपरिषदेतील शिवाजी उद्यानाची दुरावस्था झाली असून, हे उद्याने नावापुरतेच राहीले आहे. हे शहरातील सर्वात मोठे व एकमेव उद्यान आहे.

हुसेन मेमनजव्हार : जव्हार नगरपरिषदेतील शिवाजी उद्यानाची दुरावस्था झाली असून, हे उद्याने नावापुरतेच राहीले आहे. हे शहरातील सर्वात मोठे व एकमेव उद्यान आहे. त्याचीच दुरवस्था झाल्याने बालचमूंची पंचाईत झाली आहे. लहान मुलांनी विरंगुळा शोधायचा कुठे? असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे नगरपरिषदेने येथे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.जव्हार नगरपरिषद हद्दीतील शिवाजी उद्यानातील घसगुंडी, पाळणे, झोपाळे, झोके अशी खेळणी मोडकळीस आली आहेत. उद्यानात मुलांना खेळण्यासाठी एकही खेळणं व्यवस्थित राहिलेले नसून, उद्यानाची व त्यातील खेळण्यांची अवस्था भंगार झाली आहे. त्यामुळे लहान मुलांना सायंकाळी न्यावे तरी कुठे असा प्रश्न पालकांना पडला आहे.शिवाजी उद्यानाची संरक्षक कुंपण मोडले असून, उद्यानाची समोरील भिंत रोड रस्त्याच्या मार्जिनमध्ये येत असून तीही कोसळली आहे. तसेच गुरे, ढोरे, कुत्रे, डुकरांचा वावर असून, झाडी झुडपांची मोठी नासधूस झाली आहे. तसेच दिवे, बसण्याची व्यवस्था तसेच चालण्यासाठी निर्माण केलेले रस्ते या सगळ्याच बाबींची बोंब झालेली आहे.जर नगरपालिकेला हे उद्यान नीट ठेवता येत नसेल तर ते एखाद्या धनिकाला अथवा संस्थेला दत्तक देऊन त्याचे सुशोभिकरण करावे असा प्रस्तावही नागरीक नगरपालिकेला सुचवित आहेत.