शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कुंद वातावरणामुळे रोगाचे सावट

By admin | Updated: November 26, 2015 01:25 IST

आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून अधूनमधून पाऊस पडत असल्याने भाजीपाला, कडधान्ये व फळिपकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

वाडा : आठवडाभर तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून अधूनमधून पाऊस पडत असल्याने भाजीपाला, कडधान्ये व फळिपकांवर रोगाचे सावट असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत. वाडा तालुक्यातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतात विहीर किंवा कुपनलिका मारून शेतकरी भाजीपाला, कडधान्ये तसेच फळपिकांचे उत्पादन घेत असतात. मात्र गेल्या आठवडाभर ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून रिमझिम पाऊस पडत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. भाजीपाला, कडधान्ये, फळपीक यांच्यावर रोग पडला असून औषध फवारणी करूनही रोगाचे उच्चाटन होत नाही. घोणसई येथील शेतकरी सुरेश पाटील, नितीन चौधरी यांनी एक एकर जागेत गवार भाजीपाला पिकाची तसेच काकडीची लागवड केली आहे मात्र, सध्याच्या वातावरणामुळे रोगाचे सावट पसरले आहे. औषधे फवारणी करूनही रोगाचे उच्चाटन होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आंबा व काजू या फळांचा मोहरही ढगाळ वातावरणामुळे हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तर वाडा तालुक्यातील भाजीपाला, कडधान्ये, व फळपिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे वाडा तालुकाध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.