शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या वाढीव बिलांमुळे असंतोष; वसई-विरारचे ग्राहक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 03:45 IST

वीजदेयके कमी करण्यासाठी ग्राहकांनी आता महावितरणच्या विविध विभागीय कार्यालयांत फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे.

वसई : कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग न घेता दोन महिन्यांची सरासरी वीज देयके देण्यात आली आहेत. मात्र ही देयके वाढीव रकमेची असल्याने ती कमी करण्यासाठी व त्याबाबतच्या तक्रारीसाठी वसईत विविध वीज कार्यालयांत गेले दोन-तीन दिवस ग्राहकांची तोबा गर्दी व मोठ्या रांगा लागत आहेत. रविवारीही अनेक केंद्रांवर तक्रारींसाठी गर्दी झाली होती.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन महिन्यांपासून महावितरणकडून घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेणे, वीज देयके पाठविणे आदी कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे वीज ग्राहकांना एप्रिल व मे या महिन्यांची वीज देयके पोहोचली नव्हती. मात्र आता टाळेबंदीत शिथिलता मिळाल्यानंतर ज्या भागात प्रतिबंधित क्षेत्र नाही, अशा भागातील वीज ग्राहकांना वीज देयके पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र महावितरणकडून देण्यात येणारी वीज देयके ही अंदाजे आकारण्यात आल्याने ती वाढीव दिली असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी महावितरणला केल्या आहेत. मागील तीन दिवस वसई तालुक्यातील सर्वच भागातील वीज कार्यालयांमध्ये तक्रार करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली असल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे. महावितरणने सरासरी बिल काढले असले तरी त्या बिलांमध्येही मोठी तफावत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोकावीजदेयके कमी करण्यासाठी ग्राहकांनी आता महावितरणच्या विविध विभागीय कार्यालयांत फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. आधीच वसई-विरार शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यातच बिल कमी करण्यासाठी ग्राहकांना रांगा लावाव्या लागत असल्याने प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.टाळेबंदी असल्याने कोणत्याही वीज ग्राहकाचे मीटर रीडिंग घेण्यात आले नाही. त्यामुळे ग्राहकांना सरासरी वीजदेयके देण्यात आली आहेत. जून महिन्यापासून मीटर रीडिंग घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील जुलै महिन्यापासून ग्राहकांना मीटर रीडिंगच्या वापरानुसार देयके देण्यात येतील. - मंदार अत्रे, प्रभारी अधीक्षक अभियंता, महावितरण, वसई

टॅग्स :mahavitaranमहावितरण