शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पालीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

By admin | Updated: June 30, 2017 02:37 IST

नायगाव पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी पदाचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामाला ना हरकत परवाना दिल्याचे उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : नायगाव पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी पदाचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामाला ना हरकत परवाना दिल्याचे उघडकीस आल्यानंतर सदस्यांनी मासिक सभा बोलावून सरपंचाविरोधात एकमताने अविश्वास ठराव संमत केला.पाली ग्रामपंचायतीच्या सरपंच बालबीना स्टीफन डिसिल्वा यांनी हेमंत म्हसणेकर या बिल्डरला इमारत बांधण्यासाठी परस्पर ना हरकत दाखला दिला होता. या दाखल्याच्या आधारे बिल्डरने अनधिकृत इमारत बांधण्यास सुरुवात केली. याप्रकरणी ग्रामपंचायतीने नोटीस बजावून बांधकाम थांबवण्याचे आदेश बिल्डरला दिले होते. त्यानंतरही बिल्डरने बांधकाम सुरु ठेवल्याने २६ मे च्या ग्रामसभेत मोठा वाद झाला. याप्रकरणी उपसरपंच विजय राजेश बार यांनी प्रश्न उपस्थित केला असता ग्रामसेवकाने बिल्डरला ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिलेला नसून बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावली असल्याचे सांगितले. त्यावर उपसरपंच बार यांनी सरपंच बालवीना डिसिल्वा यांनी बिल्डर म्हसणेकर यांना ना हरकत दाखला दिल्याची प्रत ग्रामसभेत दाखवली होती. त्यावेळी सरपंचांनी पदाचा गैरवापर करून परस्पर ना हरकत दाखला दिल्याची बाब उजेडात आली होती. ग्रामसभेनंतर पाली ग्रामपंचायतीची मासिक सभा पार पडली. सरपंचांनी पदाचा गैरवापर करून बिल्डरला दाखला दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव उपसरपंच बार आणि सदस्या आर्सेला परेरा यांनी मांडला. हा प्रस्ताव बहुमताने संमत करण्यात आला आहे. पदाचा गैरवापर करणाऱ्या सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी यासाठी हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे. तर हेमंत म्हसणेकर यांनी सुरु केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी असा ठरावही बहुमताने संमत करण्यात आला.