शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कासात महावितरणची अनागोंदी

By admin | Updated: September 10, 2015 23:44 IST

डहाणू तालुक्यातील ग्रामीणभागात महावितरणच्या अनागोंदी व गलथान कारभार सुरू आहे. वीजग्राहकांना प्रत्येक महिन्याला रिडींग न घेता अवाच्यासव्वा काही ग्राहकांना बिले आकारण्यात येत आहेत.

-  शशिकांत ठाकूर,  कासाडहाणू तालुक्यातील ग्रामीणभागात महावितरणच्या अनागोंदी व गलथान कारभार सुरू आहे. वीजग्राहकांना प्रत्येक महिन्याला रिडींग न घेता अवाच्यासव्वा काही ग्राहकांना बिले आकारण्यात येत आहेत. माजी मंत्री शंकर नम यांना घरगुती वापराच्या मीटरसाठी ६८ हजार ७०० रू. बिल मागील महिन्यात आले आहे. दर महिन्यास सरासरी २ हजार रु. बिल भरूनही वर्ष अखेरीस कमी करून ६३ हजार ७०० रू. इतके बिल देण्यात आले. मात्र दुसरीकडे मिटर न वापरता वीजचोरी व आकडे टाकून वीज घेणाऱ्यांवर कोणतीही कारवाई महावितरण करतांना दिसत नाही.कासा परिसरात घरगुती वापरासाठी काही ग्राहकांना महिन्याची १० ते १५ हजार अशी बिले अंदाजे दिली जात आहेत. नम यांना दिलेले बिल हे मिटर रिडींग वेळोवेळी न घेता प्रत्येक महिन्याला अंदाजे बिल महावितरणाने दिले व शेवटी एकदम बिल दिले. परंतु वर्षाच्या प्रत्येक महिन्यास त्यांना सरासरी १३० युनिट वीज वापरत असल्याचे तर मे महिन्यात मात्र एकदम ६,८४२ युनिट वीज वापर दाखविला आहे. आदिवासी व गरीब ग्राहकांनाही महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे व चुकीमुळे मीटर रिडींग न घेता भरमसाठ बेहिशेबी बिले दिली जात असल्याने त्यांना भरणे अशक्य होते. परिणामी अशा ग्राहकांची वीजजोडणी तोडले जाते. त्यामुळे कासा भागातील महावितरणच्या कारभाराबाबत शंकर नम यांनी वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली असून यामध्ये लवकर सुधारणा न झाल्यास ग्राहक वितरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढतील असे पुढे त्यांनी सांगितले.या भागातील वीजबिले ही घरोघरी न पोहचविता कोणा एकाकडे गावात दिली जातात. त्यामुळे ती प्रत्येक ग्राहकाकडे नेहमी वीजबिल भरणा तारखेच्या नंतर पोहोचतात त्यामुळे प्रत्येक महिन्याला ग्राहकांना नाहक अधिक रक्कम भरावी लागते. या मीटर रिडींग व वीजबिले वाटपाचा ठेका खाजगी संस्थांना दिल्याचे त्यांनी सांगितले.आदिवासी व ग्रामीण भागातील गावामध्ये वर्षभरातून एकदम वीजलाईन दुरूस्ती केली जात नाही. तर बऱ्याच गावपाड्यावर वीजवाहक तार व खांब जीर्ण व नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात बहुतेक दिवस वीजगायब असते. तर इतर दिवशीही वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो. तसेच गेल्या १० दिवसापासून वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. दरम्यान याबाबत चारोटी वीजकार्यालयातील शाखा अभियंता दळवी यांच्याशी संपर्क साधला असता वेळोवेळी मीटर व फोटोरीडींग न घेतल्याने एकदम जास्त बिले येत असल्याचे सांगितले.