शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

धिक्कार मोर्चा अखेर रद्द, प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 01:17 IST

शुक्र वार, १७ आॅगस्ट रोजी हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, सर्व प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी पाठ फिरविल्याने हा मोर्चा रद्द झाला आहे.

नालासोपारा - मोठा गाजावाजा करून आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयावर काढण्यात येणारा सर्वपक्षीय धिक्कार मोर्चा रद्द झाला आहे. शुक्र वार, १७ आॅगस्ट रोजी हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, सर्व प्रमुख विरोधी राजकीय पक्षांनी पाठ फिरविल्याने हा मोर्चा रद्द झाला आहे.जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे वसईत पुरपरिस्थिती आली होती. ८ दिवस वसईकर पाण्यात होतो. या पुराने ५ जणांचा बळी घेतले तर कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाले होते. महापालिका प्रशासन पूर्ण हतबल ठरले होते. या पुरपरिस्थिबाबत वसईच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना जाब विचारण्यासाठी धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जनआंदोलन समितीचे प्रफुल्ल ठाकूर यांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षांशी संपर्क करण्यास सुरवात केली होती. शुक्र वार १७ आॅगस्ट रोजी हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र आता हा मोर्चा बारगळला आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी दोन बैठका आयोजिक करण्यात आल्या होत्या. मात्र त्या बैठकीला प्रमुख विरोधी पक्षांनी पाठ फिरवल्याने संपुर्ण नियोजनावर पाणी फिरले.विरोधी पक्ष काय म्हणतात...कॉंग्रेसचे वसई विरार जिल्हाध्यक्ष डॉमनिक डिमेलो यांनी या मोर्चात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही पालिका आयुक्तांना भेटून निवेदन दिले आहे. त्यांनी आमच्या सुचना मान्य करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मग पुन्हा मोर्चा का असा सवाल करत कॉंग्रेस या मोर्चामध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले. शिवसेनेचे स्थानिक नेते पहिल्या बैठकीला हजर होते. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी या मोर्चात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. जनआंदोलन समितीतून बाहेर पडून मी वसईकर मोहीम चालविणारे मिलिंद खानोलकर यांनीही या मोर्चात जाणार नसल्याचे सांगितले. मनसेचा एकही पदाधिकारी बैठकीला फिरकला नाही. भाजप नेत्यांना बोलावूनही कुणी बैठकीला आले नाही. त्यामुळे मोर्चा कसा काढायचा असा प्रश्न पडला आहे. वसई पर्यावरण संवर्धक समितीच्या समीर वर्तक यांनीही अशा सवंग मोर्चाची गरज नसल्याचे सांगितले.ठाकुरांच्या विरोधातगर्जना करणारे गप्पयाबाबत बोलताना या मोर्च्याचे समन्वयक प्रफुल्ल ठाकूर यांनी सांगितले की जनतेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राग आहे. ते मोर्चात सहभागी होणार होते. परंतु राजकीय पक्षांनी माघार घेतली. मी सर्व पक्षांच्या नेत्यांशी वैयिक्तक संपर्क साधला होता. एरवी ठाकूरांच्या विरोधात गर्जना करणारे आता गप्प बसले असा आरोप त्यांनी केला. वसईतील पुरपरिस्थितीवर सर्वांनी पालिका आणि सत्ताधाºयांवर आरोप केले होते. त्यावेळी आमदार ठाकूर यांनी आरोप करणाºयांना एकाच व्यासपीठावर येण्याचे आव्हान दिले होते. त्याला देखील अजून कुणी प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान आमदार हितेंद्र ठाकुर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.आमदार ठाकुर यांनी एकाच व्यासपिठावर सर्वांनी एकत्र या असे आवाहन करूनही कोणी प्रतिसाद दिला नव्हता. मुद्दे नसल्यामुळे इतर विरोधी पक्षांचे सहकार्य मिळत नसल्यामुळे हा मोर्चा रद्द करणे हे हास्यास्पद आहे.- सुदेश चौधरी, बहुजन विकास आघाडी जेष्ठ नेते

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या