शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा डिजिटल इंडियाचा दावा येथे पडला खोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:53 IST

डहाणू तालुक्यातील घोळ चिकणपाडा व सारणी कांढोलपाडा येथे आजही वीज नाही. त्यामुळे येथील नागरिकांना प्रकाशासाठी मिनमिणत्या चिमणीचा आधार घ्यावा लागत आहे.

शशिकांत ठाकूर कासा : डहाणू तालुक्यातील घोळ चिकणपाडा व सारणी कांढोलपाडा येथे आजही वीज नाही. त्यामुळे येथील नागरिकांना प्रकाशासाठी मिनमिणत्या चिमणीचा आधार घ्यावा लागत आहे.सरकारकडून देशातील सर्व खेड्यापाड्यात वीज पोहचली असल्याचा दावा करत असले तरी डहाणू तालुक्यातील अजून गाव पाडे विजेविना आहेत. त्यामुळे सरकारचा दावा पुर्णपणे फोल ठरतो आहे. तालुक्यातील कासा ग्रामपंचायत हद्दीतील घोळ चिकण पाडा व सारणी ग्रामपंचायत हद्दीतील कांढोल पाडा हे मुंबई अहमदाबाद महामार्गापासून अवघ्या २ की मी अंतरावर आहेत. चिकणपाडा येथे सुमारे शंभर कुटुंबे तर कांढोलपाडा येथे ५० आदिवासी कुटुंबे पिढ्यानिपढ्या राहत आहेत. मात्र, या कुटुंबाने अद्याप विजेचा प्रकाश पाहायला न मिळाल्याचे भयाण वास्तव आहे. पाच वर्षांपूर्वी घोळ चिकणपाडा येथे वीज जोडणीचे काम सुरू करण्यात आले त्यासाठी विजेचे खांब उभारण्यात आले मात्र, ही कामे अर्धवट करुन महावितरणचे कर्मचारी गायब झाल्याचे रखमा खरपडे सांगतात. उभारलेल्या या खांबावर वीजेच्या ताराच नाहीत. तर सारणी कांढोलपाडा येथे वारंवार महावितरण कडे मागणी करूनही जोडणी मिळालेली नाही.रेशन दुकानातून दोन ते तीन लिटर मिळणाऱ्या रॉकेलवर त्यांना महिना काढावा लागतो. या चिमणीच्या अंधुक प्रकाशतच येथील आदिवासी कुटूंबांना आपली सर्व कामे पार पाडावी लागतात. तर शाळकरी विद्यार्थी चिमणीच्या प्रकाशतच अभ्यास करतात. जिथे विजेचा पत्ताच नाही तेथे पंखा, टीव्ही, इस्त्री, मोबाइल आदी प्रमुख गरजा बनलेल्या वस्तूंच्या वापराची कल्पना ही कुटुंबे करू शकत नाहीत.