शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धारावी किल्ल्याचे संवर्धन की, पुरातत्त्व विभागाची बेजबाबदारी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:24 IST

भरावामुळे दुर्गमित्रांकडून नाराजी; संवर्धनाच्या नावाखाली खेळखंडोबा

वसई : जंजिरे धारावी किल्ल्यास राज्य पुरातत्व विभागाने नेमणूक केलेला निधी चर्चेचा विषय झाला असून, आजवर सर्वच शासकीय, पुरातत्वीय पातळीवर नामशेष व पूर्णपणे दुर्लक्षित असणारा जंजिरे धारावी म्हणजेच उत्तन चौक भाईदर येथील किल्ल्याचे संवर्धन होणार ही विशेष बाबच आहे. मात्र किल्ल्याच्या अर्तभागात केला जात असलेला मातीचा भरावामुळे सद्या दर्गुमित्रांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.गेल्या आठवड्यात किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या वरील अंगास असणाऱ्या तटबंदीला समांतर मातीचा नवा भराव टाकण्यात आलेला आहे. हा नवीन रस्ता किल्ल्याच्या अंतर्गत भागात का केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दर्गमित्रांनी वर्षानुवर्षे स्वच्छ केलेल्या या भागात पुरातत्वीय दृष्टीने अधिक उत्खनन करून इतिहास पुढे आणणे गरजेचे असून त्या ठिकाणी अधिक मातीचा भराव टाकण्यात येत आहे.विशेष म्हणजे ऐतिहासिक स्थळाच्या पुरातत्वीय कामाचा तपशील देणारा व कार्याची सीमा दर्शविणारा कोणताही फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही. पण नव्याने तयार करण्यात आलेल्या मातीचा भराव करताना तटबंदीच्या दोन्ही अंगास असणाºया तटबंदीचा, खडकाचा काही भाग तोडण्यात आलेला आहे. हे काही पुरातत्वीय नजरेने काम होत आहे असे दिसत नाही. तटबंदीची डागडुजी व तटबंदीत सामावलेला दरवाजा याबाबत उपाययोजना करणे आवश्यक असताना हे नवीन भराव कशासाठी ? या तटबंदीवर, किल्ल्यातील वास्तूंवर वाढत जाणारी धोकादायक झाडी यावर कोणतीही उपाययोजना न करता संवर्धनाचे काम कसे सुरू झाले. या संवर्धन बाबीत गेली अनेक वर्षे किल्ल्यावर सातत्याने संवर्धन करणाºया व किल्ल्याबद्दल तपशील माहिती असणाºया अभ्यासकांना सोबत घेणे आवश्यक आहे.किल्ल्यासाठी आलेला निधी अशा भरावात संपणार असेल तर किल्ल्याच्या संवर्धनाची बोंब कायम राहणार आहे. अनेकदा किल्ल्यावर प्रत्यक्षात काय काम सुरू आहे. हे राज्य पुरातत्व विभागास अपुºया मनुष्यबळामुळे माहीत नसते.किल्ले संवर्धनाची दिशा स्पष्ट असावीराज्य पुरातत्व अंतर्गत शिरगाव किल्ला जिल्हा पालघर व भाईदर मधील घोडबंदर कोट या दोन्ही किल्ल्यांच्या संवर्धनाबाबतीत झालेला खेळखंडोबा सर्वश्रुत असताना जंजिरे धारावी किल्ल्याच्या संवर्धनाची दिशा स्पष्ट असणे गरजेचे आहे याबाबत किल्ले वसई मोहीम परिवार प्रमुख श्रीदत्त राऊत यांनी सूचना केल्या.

टॅग्स :Fortगड