पालघर : शिवसेनेचे नगरसेवक असलेले व अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेले धनंजय गावडे यांचा शिवसेनेशी दुरान्वयेही संबंध नाही. त्यांना यापूर्वीच पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून शिवसेनेतून काढून टाकण्यात आलेले आहे. असे शिवसेनेने स्पष्ट केलेले आहे. याबाबतचे पत्रक शिवसेनेच्या मुख्य कार्यालयातून जारी करण्यात आले आहे.गावडे हे अनेक प्रकरणात गुंतलेले असून त्यांच्या विरूध्द गुन्हे दाखल झालेले आहेत. नोटाबंदीच्या काळात त्यांच्याच कारमधून दिड कोटी रूपये जप्त करण्यात आले होते. अलीकडेच त्यांच्याविरूध्द खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. माहितीच्या अधिकारान्वये माहिती मिळवूनतिचा वापर खंडणीखोरीसाठी केल्याचा आरोपही त्यांच्यावरकेला जात होता.
धनंजय गावडेंचा सेनेशी संबंध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 05:28 IST