शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भक्ताचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 17:45 IST

बोर्डी वनपरिक्षेत्रात ते लेखापाल म्हणून कार्यरत होते. पायऱ्या चढून ते गडावर गेले होते, मात्र मंदिर प्रवेशापूर्वीच अस्वस्थता वाढून त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : राज्य शासनाने गुरुवारी मंदिर प्रवेश खुला केल्यानंतर डहाणूतील महालक्ष्मी गडावर सकाळी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या गंजाड गावातील नवनाथ येथील वसंत गो. थोरगा (वय ४७) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. अन्य भक्तांनी मोबालद्वारे ही माहिती थोरगा यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

गुरुवारी घटस्थापनेच्या औचित्यावर राज्य शासनाने मंदिरे उघडण्याला हिरवा कंदील दिला. त्यामुळे महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी सकाळच्या सुमारास थोरगा हे गडावर गेले होते. पालघर जिल्ह्यात ढगांचा गडगडाट व पावसाची शक्यता वर्तवली असून, ऑक्टोबर हिटमुळे वातावरणात प्रचंड गर्मी जाणवत आहे. त्यामुळे थकवा व घामाच्या धारा वाहतात. पायऱ्या चढून ते गडावर गेले होते, मात्र मंदिर प्रवेशापूर्वीच अस्वस्थता वाढून त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.

अन्य भक्तांनी हा प्रकार पाहून थोरगा यांच्या मोबाइल फोनमधील संपर्क क्रमांकाद्वारे कुटुंबीयांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांचे शव कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. ते १९९६ पासून डहाणू वनविभागाचे कर्मचारी होते. बोर्डी वनपरिक्षेत्रात ते लेखापाल म्हणून कार्यरत होते. शासनाने मंदिरांचे दरवाजे खुले केल्याने डहाणूच्या महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी भक्तांकडून पसंती दिली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका