शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाणी असूनही डहाणूतील ३० गावपाडे तहानलेलेच

By admin | Updated: October 15, 2015 01:22 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील डहाणू-बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे.

शौकत शेख, डहाणूपालघर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील डहाणू-बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. डहाणूच्या ३० गावांना तसेच खेड्यापाड्यांना रोज शुद्ध पाणी देण्याऐवजी पाच, सहा, आठ दिवसांआड अपुरा पाणीपुरवठा होतो आहे. सणासुदीच्या दिवसांत पाण्यासाठी महिलांचे हाल होत आहेत. परिणामी नागरिकांवर विहीर, हातपंपांचे दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ आल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डहाणू तालुक्याच्या साखरे धरणात पाण्याचा मुबलक साठा आहे. परंतु, या धरणावर सर्वप्रथम अधिकार असलेल्या या पंचक्रोशीतील गावे तसेच आदिवासीपाडे यांना आजही पुरेसे व वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ती तहानलेलीच आहेत. येथील सूर्या, कवडास धरणांचे पाणी मुंबई, वसई, विरार भागात रोज दिले जाते. परंतु, भूमिपुत्रांना चार, आठ दिवसांआड पाणी मिळते. डहाणूच्या सागरीकिनाऱ्यावर वसलेल्या ३० गावांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने शासनाने १९९६ मध्ये बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना सुरू करून घराघरांत पिण्याचे पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली. परंतु, या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने येथील मुख्य जलवाहिनी सातत्याने फुटू लागली व येथे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. तर, २००६ मध्ये ही योजना कालबाह्य झाल्याने बाडा-पोखरण पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. परंतु, निधीअभावी सदर प्रस्ताव शासनदरबारी धूळखात पडला होता. परंतु, आमदार राजेंद्र गावित तसेच आनंद ठाकूर यांच्या प्रयत्नाला यश येऊन डहाणू आणि पालघर तालुक्यांतील आदिवासीबहुल बाडा-पोखरणसह ३० गावांच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी शासनाच्या पाणीपुरवठा तसेच स्वच्छता विभागाने नोव्हेंबर २०१३ ला मंजुरी दिली. ४३ कोटी २८ लाख ३९ हजार रुपयांच्या निधीस मान्यता देऊन हे काम एका खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आले. अनेक महिन्यांपासून कामालाही सुरुवात झाली. परंतु, कामाला गती नसल्याने हे काम वेळेवर पूर्ण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बाडा-पोखरण योजनेची जलवाहिनी वाणगाव, साखरे भागात सातत्याने फुटत असल्याने दुरुस्तीनंतर मातीमिश्रित गढूळ पाणी येत असल्याची तक्रार चिंचणी, वरोर, वाढवण, ओसार, बहाड डहाणू भागातील हजारो नागरिकांनी केली आहे.