शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

पाच नद्यांचे वरदान लाभूनही वाडा तालुका तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 00:55 IST

महिलांच्या डोक्यावर पुन्हा हंडा-कळशी

वसंत भोईरवाडा : तालुक्यात बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळ, देहजे, गारगाई या पाच नद्यांचे वरदान वाडा तालुक्याला लाभले आहे. दोन खासदार तीन आमदार या तालुक्याला लाभले असूनही या पाण्याचा लाभ तालुक्याला होत नाही. तालुक्याला मुबलक प्रमाणात पाणी मिळवून देणारे लोकप्रतिनिधी न मिळाल्याने तालुक्यातील अनेक गावांतील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन वणवण फिरावे लागत आहे. 

वाडा तालुक्यात १६८ खेडी २००च्या आसपास पाडे, तर ८६ ग्रामपंचायती आहेत. तीन लाखांच्या आसपास तालुक्याची लोकसंख्या आहे. तालुक्यात काही प्रमाणात उद्योगधंदे वाढल्याने लोकसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाड्यात औद्योगिकीकरणामुळे  रोलिंग मिल्स, बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांना पाण्याची मोठी गरज असल्याने पाण्याचा उपसा होत आहे. त्यासाठी खासगी कूपनलिकेत टॅंकरने पाण्याचा उपसा केला जात आहे. एकट्या कोकाकोला कंपनीला दररोज लाखो  लिटर पाणी लागते. हे पाणी वैतरणा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातून कंपनी उचलते.  

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुंभाची क्षमता १२ लाख लिटर एवढीच आहे. ४० हजार लोकसंख्या आहे. २० लाख लिटर वाडा शहरासाठी पाणी दररोज लागते. एका व्यक्तीला साधारण ५५ लिटर पाणी लागते. त्यामुळे आठ लाख लिटर पाणी वाडा शहराला दररोज कमी पडत असल्याने नागरिकांना पाणीटंचाई जाणवत आहे. वाडा नगरपंचायतीत तीन वर्षांत तीन पाणीपुरवठा सभापती बदलले. नव्याने आलेले सभापती संदीप गणोरे यांनीही अपेक्षाभंग केला. शहराचा काही भाग चढउताराचा  आहे. काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. उंच भागावर असलेल्या विवेकनगर, शिवाजीनगर, सोनारपाडा, मोहट्याचापाडा या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. १९९ मध्ये सुरू झालेली ही नळयोजना वाढत्या नगरांना पाणीपुरवठा करणार तरी कशी? त्यामुळे या नगरातील नागरिकांना कूपनलिकेच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. 

गरीब जनतेला टॅंकरचा आसरागरीब जनतेला टॅंकरचा आसरा घ्यावा लागत आहे. नगरपंचायतीच्या  कराचा नियमित भरणा करणाऱ्या नागरिकांना टंचाई, तर कर बुडवणाऱ्यांना मुबलक पाणीपुरवठा अशी परिस्थिती नगरपंचायतीत असल्याचे शिवाजीनगर येथील रहिवासी दामोदर पाटील यांनी सांगितले.  पश्चिम वाड्याला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे भाजपचे नगरसेवक मनीष देहरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार