शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव-खोचिवडेकरांची वणवण

By admin | Updated: April 27, 2017 23:46 IST

नायगाव खोचिवडे परिसरातील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. पाणी पुरवठा योजनेतून पाणी साठयासाठी उभारलेल्या जलकुंभालाही

विरार : नायगाव खोचिवडे परिसरातील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. पाणी पुरवठा योजनेतून पाणी साठयासाठी उभारलेल्या जलकुंभालाही पाण्याची प्रतिक्षा करावी लागते आहे.पाणी पुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेल्या जलकुंभांची अवस्था देखभाल दुरूस्तीविना दयनिय झाली आहे.शिवाय त्याला भेगाही पडल्या आहेत. त्यात योजनाच कार्यान्वीत न झाल्यामुुळे स्थानिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.या गावातील सोसायट्यां टँकरमार्फत पाणी मिळवून आपली तहान भागवत आहेत. मात्र, ग्रामस्थांनी रस्त्यावर, मुख्य वहिवाटीवर ओटे, पायऱ्या बांधून दगड मांडल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी टँकरचे पाणीही ग्रामस्थांच्या नशीबी राहिलेले नाही.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ६९ गावांसाठी असलेल्या पाणी योजनेत खोचिवडे गावाचा समावेश करण्यात आला होता.त्यानुसार काही वर्षांपूर्वी जलकुंभही उभारण्यात आले होते.मात्र,तेंव्हापासून जलकुंभालाच पाणी मिळाले नसल्यामुळे ते आता भेगाळलेल्या अवस्थेत पाण्याची वाट पाहत उभे आहे.या योजनेच्या जलवाहिन्याही धूळ खात पडल्या आहेत. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय असलेली मासेमारीही मासळीच्या तुटवड्यामुळे धोक्यात आली आहे.त्यामुळे या व्यवसायाबरोबरच छोट्या-मोठ्या नोकऱ्या करून मच्छिमार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित आहेत.पाण्याच्या टंचाईमुळे नोकरी करावी की पाण्याचा शोध घ्यावा.असा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा राहिला आहे. त्यामुळे दरवर्षी उद्भवणाऱ्या या पाणी संकटावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.(वार्ताहर)