शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

ऐन मार्चमध्ये वसई-विरारला वाढली पाणी टँकरची मागणी! दरातही झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:48 IST

बहुतांश ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा

प्रतीक ठाकूरविरार : मार्च महिना अर्धा संपत नाही तोच वसई-विरारच्या शहरी भागांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. परिणामी टँकरने पाणी विकत घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने टँकरची मागणी आणि त्याच्या दरातही वाढ झाली आहे.

वसई-विरार शहरातील नागरिकांना पालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो; परंतु काही ठिकाणच्या भागात पालिकेतर्फे पुरविले जाणारे पाणी अपुऱ्या प्रमाणात येत आहे, तर काही भागांत अजूनही पाणी उपलब्ध झालेले नाही. येथील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी टँकरची मागणी वाढत आहे.

वसई-विरार शहरात एक हजारांहून अधिक टँकर आहेत. हे टँकर विरार पूर्व-पश्चिम, नालासोपारा पूर्व, वसई पूर्व, नायगाव यासह विविध ठिकाणच्या भागात पाणीपुरवठा करतात. जेथे एका टँकरची गरज होती त्या ठिकाणी दोन टँकर मागवावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. जे टँकर १ हजार २०० रुपयांना मिळत होते; तेच टँकर आता १५०० ते १७०० रुपयाने विकले जाऊ लागले आहेत. काही ठिकाणी दोन हजारांहून अधिक रक्कम त्यासाठी मोजावी लागत आहे. जेथे पाणी उपसा होतो; अशा ठिकाणच्या विहिरी व बोअरवेल यांची भूजल पातळी खालावली आहे. आधीच कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने जे पाणी विक्री करतात; तेथे पाण्याचे दर वाढतात. त्यामुळे टँकरचे दरही वाढले असल्याचे टँकरमालकांनी सांगितले.

ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करा !महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८९ मधील कामण, चिंचोटी, देवदल, गिदराई (सातिवली) या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गिदराईपाडा येथील ग्रामस्थांनी नळकनेक्शनसाठी पैसे भरूनही नळकनेक्शन दिले जात नाही. कामण दलित वस्ती योजना एक वर्षापासून बंद आहे. येथील लघुपाटबंधारे (ग्रामपंचायत काळातील) पाणीपुरवठा योजना बंद आहे. कामण, चिंचोटी, देवदळ येथे दोन महिन्यांपासून रस्ते खोदून जलवाहिनी टाकली आहे. परंतु पाणीपुरवठा केला जात नाही. पालिकेने येथील पाणीप्रश्न मार्गी लावा; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी पालिकेला दिला आहे.

टॅग्स :Waterपाणी