शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बिगर आदिवासी उभारणार निर्णायक लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:27 IST

वाडा : ९ जून २०१४ रोजी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी काढलेल्या अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रात येणाऱ्या ...

वाडा : ९ जून २०१४ रोजी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी काढलेल्या अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील आदिवासी उपयोजना क्षेत्रात येणाऱ्या १३ जिल्ह्यात गांव पातळीवर काम करणाºया वर्ग ३ व वर्ग ४ च्या विविध पदांसाठी आदिवासी समाजाला नोक-यांमध्ये १०० टक्के आरक्षण देण्यात आले.

भारतीय घटनेच्या कोणत्याही कलम अथवा निकषामध्ये न बसणा-या या अद्यादेशामुळे १३ जिल्ह्यातील बिगर आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला आहे, त्याविरोधात २०१४ पासून बिगर आदिवासी समाज न्यायालयीन तसेच रस्त्यावरील लढाई लढत आहे, परंतु शासनाकडून बिगर आदिवासी समाजाला शासनाने कोणताही दिलासा दिलेला नाही. शासन विविध निर्णय घेऊन सन २०१४ ते २०१८ या कालावधीत आदिवासी समाजासाठी १०० टक्के आरक्षीत केलेल्या १८ पदांच्या भरतीसाठी व सद्यस्थितीत या जिल्ह्यात काम करीत असलेल्या बिगर आदिवासी कर्मचाºयांच्या बदल्यासाठी जाहिराती व शासन निर्णय प्रसिद्ध करीत आहे. शासनाच्या अध्यादेशाविरोधात बिगर आदिवासींचा लढा सुरु असताना दि. २७ आॅगस्ट २०१८ रोजी ज्या अनूसूचित क्षेत्रात बिगर आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा जास्त आहे अशा क्षेत्रातील १०० टक्के रिक्त पदे स्थानिक अनूसूचित जमातीतील उमेदवारांमधूनच भरण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी विविध खात्यांच्या १० सचिवांची समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या समितीने तीन महिन्याच्या आत आपला अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु हा पुनर्विचार समितीचा निर्णय म्हणजे शासनाने केलेला एक फार्स ठरला. कारण अशा प्रकारचा कुठलाही सर्व्हे झाल्याचे दिसले नाही. उलट एकीकडे बिगर आदिवासी समाजाला पुर्न विचाराचे गाजर दाखविण्यात आले व दुसºया बाजूला भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या गेल्यात. कर्मचाºयांचे बदल्यांचे विकल्प भरण्यास सुरवात केली आहे. शासनाच्या या दुटप्पी धोरणा विरोधात बिगर आदिवासी समाजामध्ये संताप उसळला आहे.अन्यायाच्या विरोधात उभारणार आता निर्णायक लढाया अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात निर्णायक लढा उभारण्याची बिगर आदिवासी समाजात भावना तयार झाली आहे. या आधी ही गेल्या चार वर्षामध्ये ठाणे, पालघर जिल्ह्यात बिगर आदिवासी समाजाने मोर्चे, धरणे, उपोषणे, मुंडण आदी आंदोलने केली आहेत. शिवाय न्यायालयीन लढाही तो सध्या देत आहे.