शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन रकमेच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:21 IST

अनेक शेतकºयांनी कर्जाचा प्रामाणिक उपयोग करून आपली भातशेती, नागली, वरई, उडीद इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले व शेतातून मिळणाºया ध्यान्याची विक्री करून घेतलेले पीक कर्ज वेळेवर म्हणजे ३१ मार्चपूर्वी भरले

विक्रमगड : जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी २०१९-२० च्या खरीप हंगामात प्राथमिक सहकारी संस्थांकडून हजारो रुपयांचे कर्ज उचलले होते. हे कर्ज अनेक शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे फेडलेले आहे, मात्र ज्यांनी कर्ज फेडले नाही, त्यांना कर्जमाफी झाली आहे. तरी नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आता प्रोत्साहनपर रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.

अनेक शेतकºयांनी कर्जाचा प्रामाणिक उपयोग करून आपली भातशेती, नागली, वरई, उडीद इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले व शेतातून मिळणाºया ध्यान्याची विक्री करून घेतलेले पीक कर्ज वेळेवर म्हणजे ३१ मार्चपूर्वी भरले. नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकरी वर्गास शासनाने कर्जमाफीत बसवले नाही व कर्ज थकवणाºया शेतकरी वर्गास योजनेचा लाभ दिला. थकबाकीदार शेतकरी नव्याने पीककर्ज घेण्यास पात्र झाले. हे धोरण चुकीचे असून प्रामाणिकपणे कर्जफेड करणाºया शेतकरीवर्गावर अन्याय करणारे आहे. जून महिना सुरू झाला असून या वर्षी समाधानकारक पाऊस होईल, असे वेधशाळेने म्हटलेले आहे. खरीप हंगामाची कामे सुरू होताना दिसत आहेत. शेतकरी वर्ग प्राथमिक कामाच्या गडबडीत आहे. प्रामाणिक शेतकरी वर्गाने मुदतीत पीककर्ज भरले असल्याने महाराष्ट्र शासनाने अधिवेशन काळात दिलेला शब्द पाळून शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर प्रोत्साहन पार रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाच्या वतीने विक्रमगड येथील जाणकार शेतकरी व सहकारी संस्थेचे चेअरमन घनश्याम आळशी यांनी एका पत्राद्वारे शासनाकडे केली आहे.प्रामाणिक कर्जफेड केलेल्या शेतकºयांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी आता केली जात आहे. परंतु, दोन महिने झाले तरी या प्रामाणिकपणे कर्जफेड करणाºया शेतकरीवर्गाच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर ५० हजार रक्कम जमा झालेली नाही. कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर असल्याने अडचणी येत आहेत.