शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यात पडून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:46 IST

वाढवण गावांतील वरोर -वाढवण आणि वाढवण अप्रोच रस्त्याची चाळण होऊन त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्याने भर गणेशोत्सवात रमिला जयवंत राऊत वय ५३ या महिलेचा बळी घेतला.

शौकत शैख डहाणू : वाढवण गावांतील वरोर -वाढवण आणि वाढवण अप्रोच रस्त्याची चाळण होऊन त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्याने भर गणेशोत्सवात रमिला जयवंत राऊत वय ५३ या महिलेचा बळी घेतला.वरोर - वाढवण रस्त्यावर मुंडेश्वरी देवालयाच्या पाठीमागे पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकीचा अपघात होऊन त्यात रमिला राऊत यांच्या डोक्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना अत्यव्यस्थ अवस्थेत सुरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचा २९ आॅगस्टला मृत्यू झाला.वरोर -वाढवण आणि वाढवण अप्रोच रस्ता हे जुने रस्ते असून, या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. शिवाय बोईसर -वाढवण आणि वाणगाव-वाढवण अशा दिवसाला एस.टी. बस च्या ३२ फेºया होत असतात. वाढवण गावांत डायमेकिगचा व्यवसाय घराघरात चालत असल्याने डाय घेण्यासाठी दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मुंबई, कोलकत्ता, मद्रास आणि दुबई येथून मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात मात्र रस्ते उखडून गेल्याने त्याची चाळण होऊन गुडघाभर खोलीचे खड्डे पडले आहेत त्यावरुन चालणे ही मुश्कील झाले असून,रोज अपघात घडत असतात तसेच हा रस्ता दुरु स्त न झाल्यास १५ दिवसात एसटीच्या संपूर्ण फेºया बंद करण्यात येतील असे एस टी कामगार संघटनांनी कळविले आहे. या गावातून दररोज इतर प्रवाशांबरोबर शेकडो कामगार बोईसरच्या एम.आय.डी.सी मध्ये कामासाठी जात असतात. एसटी बंद झाल्यास या सर्व कामगारांना रोजगाराला मुकावे लागणार आहे.सत्ताधारी नेत्यांनी गावात आपल्याला मत मिळाली नाहीत म्हणून ह्या गावाचा विकासच होऊ द्यायायचा नाही असे ठरविल्याचे दिसते. म्हणून एकाही रस्त्याच्या दुरूस्तीसाठी तरतूद केली जात नाही इतर गावांना मात्र करोडोचा निधी वापरण्यात येतो अशी अवस्था आहे.