शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

चिखले समुद्रकिनारी आढळले मृत डॉल्फिनच्या पोटात कासव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 23:05 IST

स्थानिकांनी पाहिले दुर्मिळ चित्र। पशुवैद्यक अभ्यासकही आश्चर्यचकित

डहाणू / बोर्डी : चिखले समुद्रकिनाऱ्यावरील खाडीपाडा येथे मृत डॉल्फिन आढळला असून त्याच्या पोटात सागरी कासव असल्याचे व्यायामाला जाणाºया स्थानिकांनी पाहिले. हा दुर्मिळ प्रकार असल्याने वन्यजीव आणि पशुवैद्यक अभ्यासकांनाही त्यामुळे आश्चर्यचकित केले आहे.

शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिखले खाडीपाडा किनाºयावर मृत डॉल्फिन आढळला होता. त्याच्या शरीराचे भटके कुत्रे लचके तोडत असल्याचे लक्षात येताच महेश सुरती आणि शैलेश गोंधळेकर या स्थानिकांनी पहिले. शरीर कुजल्याने तसेच कुत्र्यांनी लचके तोडल्याने पोटातील आतडी आणि काही भाग स्पष्टपणे दिसत होता. यामध्ये डॉल्फिनने भक्ष केलेल्या सागरी कासवाचे संपूर्ण शरीर होते. डॉल्फिनने कासवाचा मानेकडून गिळंकृत केले होते. हे कवच साधारणत: दीड फूट लांबीचे असावे अशी माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली.दरम्यान, तज्ज्ञांच्या मते डॉल्फिनचे खाद्य खेकडे आणि लहान मासे असताना कासवाला भक्ष कसे काय केले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून अनेकांना विश्वास बसलेला नाही. त्यामुळे या दुर्मिळ प्रकाराची चर्चा रंगत आहे.