शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

पारनाक्यावरील विजेचा धोकादायक खांब बदलला

By admin | Updated: August 8, 2015 21:54 IST

पारनाका येथील विजेचा गंजलेला लोखंडी खांब कोसळून अपघात होणार, अशी बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महावितरणने तत्काळ तो बदलून नवीन खांब रोवला आहे,

डहाणू : पारनाका येथील विजेचा गंजलेला लोखंडी खांब कोसळून अपघात होणार, अशी बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महावितरणने तत्काळ तो बदलून नवीन खांब रोवला आहे, तर ‘रस्त्यावरील बेसुमार झाडे छाटण्याची जबाबदारी कुणाची’ असे वृत्त लोकमतच्या अंकात प्रसिद्ध होताच पालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या चार-पाच दिवसांपासून रस्त्यावरील झाडे छाटण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. वीज महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आगार परिसरात विजेची तार तुटून मोटारसायकलने जाणाऱ्या हितेन कर्णावटला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर मोठी दुर्घटना पारनाका येथे होण्याची शक्यता होती. येथे ४० ते ५० वर्षांपूर्वी टाकण्यात आलेले विजेचे खांब जीर्ण झाले होते. मात्र, हा खांब बदलण्याऐवजी त्यास नायलॉनच्या दोरीने बांधून ठेवले होते. डहाणू नगरपरिषद हद्दीत हजारो जुनी झाडे रस्त्याच्या दुतर्फा असून पावसाळ्याच्या दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ती अनेक ठिकाणी तुटून पडली होती. तर, काही दिवसांपूर्वी मसोली येथे मोटारसायकलने जाणाऱ्या राजेश प्रजापती (४०) यांच्या अंगावर नारळाचे झाड कोसळल्याने ते जागीच ठार झाले ॅहोते.याची दखल घेत पालिकेच्या आरोग्य विभागाने युद्धपातळीवर मसोली, सेंट मेरी, पारनाका या भागांतील रस्त्यावर झुकलेली झाडे छाटण्याचे काम सुरू केले आहे. (वार्ताहर)