शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

डायमेकिंग ग्रामोद्योग ठप्प, ५० गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:25 IST

पश्चिम किनारपट्टीवरील पन्नास ते साठ गावामध्ये सुरु असलेल्या भारनियमनामुळे घरोघरी चालणारा डायमेकिंग उद्योग ठप्प झाला आहे. यातुन दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याने सुमारे पंचवीस हजार कुशल-अकुशल कारागिरांबरोबरच या व्यवसायाशी संबंधित असलेल्या आदिवासी तरूणांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शौकत शेख ।डहाणू: येथील पश्चिम किनारपट्टीवरील पन्नास ते साठ गावामध्ये सुरु असलेल्या भारनियमनामुळे घरोघरी चालणारा डायमेकिंग उद्योग ठप्प झाला आहे. यातुन दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याने सुमारे पंचवीस हजार कुशल-अकुशल कारागिरांबरोबरच या व्यवसायाशी संबंधित असलेल्या आदिवासी तरूणांवर उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, जि.प. सदस्या विपूला सावे आदींच्या शिष्टमंडळाने १३ सप्टेंबर रोजी पालघर जिल्हा वीज महावितरण कंपनीचे अभियंता दिपक पाटील तसेच कार्यकारी अभियंता डोंगरे यांना भेटून अन्यायकारक भारनियमनामुळे शेती, बागायती बरोबरोबरच उद्योगांच्या नुकसानीची माहिती दिली.स्त्रियांच्या सौंदर्य प्रसाधनातील नेकलेस, इयरिंग, मंगळसूत्र, चेन, ब्रेसलेट, अंगठी, आदि मुख्य अलंकार घडविण्यासाठी मुख्य साधन असलेल्या डाय (साचा) बनवण्याचा डायमेकिंग व्यवसाय भारनियमनामुळे संकटात सापडला आहे.चिंचणी-तारापूर येथील डायला विशेषत: कोलकाता, बांगलादेश, नेपाळ, भूतान श्रींलंका, दूबई, मुंंबई, हैद्राबाद, कानपूर, बनारस, लखनौ, दिल्ली, बिहार येथून मोठया प्रमाणात मागणी असते.>डहाणूच्या सागरी किनाºयावर वसलेल्या चिंचणी, वरोर, वाढवण, ओसार, डहाणूवाडी, इत्यादी पन्नास ते साठ गावांतील उच्चशिक्षीत तरूण सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता हस्तकौशल्य आणि अंगमेहनत या भांडवलावर अनेक पिढयांपासून वरील गावांत पारंपरिक डायमेकिंग व्यवसाय करीत आहे.