शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत आदिवासींचे बिऱ्हाड पाठीवर

By admin | Updated: September 5, 2015 22:21 IST

पालघर जिल्ह्यातील गौणखनिज तसेच डहाणू तालुक्यातील उद्योगबंदीमुळे हजारो आदिवासींवर रोजगारासाठी स्थलांतरीत होण्याची पाळी ओढावली आहे. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी

डहाणू : पालघर जिल्ह्यातील गौणखनिज तसेच डहाणू तालुक्यातील उद्योगबंदीमुळे हजारो आदिवासींवर रोजगारासाठी स्थलांतरीत होण्याची पाळी ओढावली आहे. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मुलाबाळांचे संगोपन करण्यासाठी त्यांच्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे डहाणूच्या अतीदुर्गम भागातील शेकडो आदिवासी तरूण रोजगार शोधण्यासाठी दिवसभर शहरी व बंदरपट्टी भागाबरोबरच तारापुर औद्योगिक वसाहत आणि गुजरात मधील वापी जी. आय.डी.सी सारख्या ठिकाणी सायकल तसेच मिळेल त्या वाहनाने जा-ये करीत आहेत.पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठरविलेल्या डहाणूत केंद्र सरकारने १९९१ मध्ये एका अधिसूचनेद्वारे उद्योगबंदी लादल्याने गेल्या चोवीस वर्षात येथे कोणताही प्रकल्प किंवा कोणताही प्रकारचा कारखाना सुरू होऊ शकला नाही. उद्योगबंदीच्या नावाखाली या ठिकाणी कोणी साधी पिठाची चक्की देखील कोणी काढू शकले नाहीत. परिणामी लोकसंख्येत वाढ होत असल्याने सुशिक्षित बेरोजगार तसेच कुशल, अकुशल कारागिरांबरोबरच अंगमेहनत करणाऱ्या आदिवासी मजुरांना गुजरातच्या उंबरगाव औद्योगिक भागावर अवलंबून राहावे लागते. हिच स्थिती शहरी आणि बंदरपट्टी भागातील आहे. शहरी भागातील तरूण, तरूणी अनेक प्रकारचे उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी अभावी आणि कोणताही उद्योगधंदा उभारू शकत नसल्याने गाव सोडून मुंबई, वापी, सुरत सारख्या शहराकडे धाव घेऊ लागला आहे. त्यामुळे शिक्षण घेऊन ही सुशिक्षित तरूणांना कोणतेही भवितव्य उरलेले नाही.साडेचार लाख लोकसंख्ये पैकी सत्तर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या डहाणू तालुक्यात एकूण ४१ हजार ४९० जॉबकार्डधारक आहेत. त्यात मजुरांची संख्या १ लाख १४ हजार ३७२ एवढी असतानाही सध्या डहाणूत तेरा ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष लागवड, सिंचन विहिरीच्या कामावर फक्त १०५ आदिवासी मजूर आहेत तर सामाजिक वनीकरण तसेच वनप्रकल्प येथील कामावर १०९ असे केवळ २१४ आदिवासी मजूर आहेत. त्यामुळे डहाणूच्या पूर्व भागातील दिवसी, दाभाडी, वंकास, थिलोंडा, गडचिंचला, बापूगाव, रामपूर, किन्हवली, दाभोण, बांधघर, येथील शेकडो तरूण पावसाळ्याच्या दिवसात रोजगाराच्या शोधात बाहेर पडले आहे.