शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूतील उद्योगबंदी हटणार-जावडेकर

By admin | Updated: July 28, 2015 23:30 IST

डहाणूत नवीन उद्योगंधदे येऊन येथील लोकांना रोजगार मिळावा यासाठी डहाणू तालुक्यात जून १९९१ चे नोटिफिकेशन रद्द करण्याचे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

डहाणू : डहाणूत नवीन उद्योगंधदे येऊन येथील लोकांना रोजगार मिळावा यासाठी डहाणू तालुक्यात जून १९९१ चे नोटिफिकेशन रद्द करण्याचे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आ. आनंद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाला दिल्लीत सोमवारी दिले.डहाणू तालुक्यात जून १९९१ चे नोटिफिकेशन रद्द करावे व येथील हजारो आदिवासी व सर्वसामान्यांसाठी रोजगाराचे दार उघडावे या मागणीसाठी आ. आनंद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष राजेश पारेख, उद्योजक रविंद्र फाटक, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक मिहिर शाह यांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची सोमवारी भेट देऊन चर्चा करून निवेदन सादर केले. यावेळी जावडेकरांने १९९१ चे नोटिफिकेशन रद्द करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मुंबईपासून १२० कि. मी. अंतरावर तसेच महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवरील डहाणू तालुका पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याचे ठरवून केंद्र शासनाने १९९१ मध्ये एका अधिसूचनेद्वारे या परिसरात उद्योगबंदी लादली. या जाचक अटीमुळे चोवीस वर्षात येथे एकही नवीन कारखाना सुरू झालेला नाही. हजारो सुशिक्षित बेकार तरूणांना रोजगारासाठी गुजरात राज्यात जावे लागते. लघुउद्योगांना बंदी असल्यामुळे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कामगारांच्या कुटूंबाची परिस्थिती बिकट झाली आहे. तर कायमस्वरूपी रोजगार मिळत नसल्याने स्थलांतर करावे लागते. (वार्ताहर)डहाणूतील उद्योगबंदी बाबत जनमत जाणून घेण्यासाठी २००३ मध्ये केंद्रीय पथक डहाणूत आले होते. यावेळी डहाणू पंचायत समितीने आयोजित केलेल्या बैठकीत डहाणूतील शेतकरी, बागायतदार, लघु उद्योजक, तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते, पुढारी, कार्यकर्ते, पर्यावरणवादी नेत्यांचे एकमत न झाल्याने डहाणूच्या विकासाला मारक असलेली उद्योगबंदीची अधिसूचना तशीच जारी राहिली.