शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू परिसरात अंधार उग्र आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: June 21, 2016 00:57 IST

डहाणू तालुक्याच्या ग्रामीण, शहरी भागांसह खेडोपाडयात गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले असतानाच रविवारी रात्री या परिसरात

डहाणू : डहाणू तालुक्याच्या ग्रामीण, शहरी भागांसह खेडोपाडयात गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले असतानाच रविवारी रात्री या परिसरात पावसाचे टिपटिप सुरू होताच डहाणू शहरासह सुमारे तीस ते चाळीस गावे अंधारात बुडाली. डहाणू, चिंचाजी, आगर या ठिकाणी अनेक वीजवाहिन्या तुटून पडल्या परतु, सुदैवाने कुठेही मनुष्यहानी झाली नाही. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने डहाणू वीज कार्यालयात पालघरचे कार्यकारी अभियंता डोंगरे यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली असून येत्या पंधरा दिवसांत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.डहाणूच्या बंदरपट्टी तसेच जंगलपट्टी भागातील चिंचाजी, परोर, वानगाव, साखरे, या फिडर अंतर्गत दिवसातून अनेक वेळा बिघाड होत असल्याने येथील सुमारे चाळीस ते पन्नास गावात एक तासही वीज पूरवठा सुरळीत राहत नसल्याने नागरिकांत महावितरणविरोधात कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील जुनाट विजेच्या तारा कमकुवत ट्रान्सफार्मर, तसेच गंजलेले वीजेचे खांब बदलण्यात येत नसल्याने पावसाळयात या परिसरात काळोख असतो. या बाबात सातत्याने तक्रारी करून देखील डहाणूच्या पश्चिमभागातील गावांत कोणतीच सुधारणा होत नसल्याने वीजेवर अवलंबून असलेल्या लघुउद्योजक, बागायतदार तसेच डायमेकर्सचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.पावसाळयाच्या दिवसात वीज वाऱ्यासह पाऊस पडला की वीजपुरवठा खंडीत होतो. शिवाय अनेक ठिकाणी वीजेच्या तारा तुटून पडलेल्या असल्याने त्या दुरूस्ती करण्यासाठी वारंवार तक्रार करूनही कर्मचारी किंवा अधिकारी येत नाही. चिंचाजी गावांत तर डीओ. बरोबरच लहान मोठी दुरूस्ती गावातीलच तरूण मंडळी जीव धोक्यात घालून करीत असतात. वीजपुरवठा केव्हा सुरू होईल, असे अधिकारी तसेच सबस्टेशनला विचारल्यास ग्रामस्थांना उध्दट उत्तरे दिली जातात. (वार्ताहर)