शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

डहाणू-विरार मेमूमध्ये महिलेची प्रसूती

By admin | Updated: January 12, 2016 00:33 IST

मेमूमधून सफाळेहून विरारला डॉक्टरकडे निघालेल्या महिलेने वैतरणा आणि विरार दरम्यान एका मुलीला जन्म दिला. विरार स्टेशनमध्ये पोलिसांनी धावपळ करून माता आणि मुलीला

वसई : मेमूमधून सफाळेहून विरारला डॉक्टरकडे निघालेल्या महिलेने वैतरणा आणि विरार दरम्यान एका मुलीला जन्म दिला. विरार स्टेशनमध्ये पोलिसांनी धावपळ करून माता आणि मुलीला जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले.नम्रता किणी (२१) पती योगेश सोबत सफाळ्याहून विरारला जाणाऱ्या सकाळच्या ९.0५ च्या मेमूमधून विरार येथील संजीवनी हॉस्पीटलमध्ये निघाले होते. मात्र, गाडीने वैतरणा स्टेशन सोडल्यानंतर नम्रताला प्रचंड कळा येऊ लागल्या. डब्यातील महिला प्रवाशांच्या हा प्रकार लक्षात घेता त्यांनी नम्रताला मदत केली आणि अवघ्या काही मिनिटातच चालत्या गाडीत नम्रताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही बातमी डब्यातील काही प्रवाशांनी मोबाईलवरुन विरार येथील रेल्वे पोलिसांना दिली होती. मेमू विरार स्टेशनमध्ये शिरताच महिला कॉन्स्टेबल सोनाली पवार यांनी क्वीक रिस्पॉन्स टीमसोबत अ‍ॅम्बुलन्स मधून नम्रता आणि तिच्या बाळाला हॉस्पीटलमध्ये दाखल केले. योगेश आणि नम्रताने लगेचच मिळालेल्या मदतीबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)