शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू तालुक्यात ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:26 IST

‘जेएनपीटी’चे श्राद्ध : बंदरविराेधी घाेषणांचा घुमला आवाज

डहाणू : निसर्गसौंदर्याने नटलेल्या डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाढवण येथील प्रस्तावित बंदराला विरोध करण्यासाठी मंगळवारी चिंचणी ते धाकटी डहाणूपर्यंतच्या सर्व गाव-खेड्यांतील नागरिकांनी एकजुटीने बंद पाळला. किनारपट्टी भागातील दुकाने, व्यवसाय बंद असल्याने गावांतील सर्व व्यवहार ठप्प पडले हाेते. ‘एक दो एक दो वाढवण बंदर फेक दो’ अशा गगनभेदी घोषणा देत महिला, पुरुष आणि बच्चेकंपनी निषेधाचे फलक हातात घेऊन रस्त्यावर उतरले हाेते. तसेच जेएनपीटीचे श्राद्ध घालून आंदाेलनातील कार्यकर्त्यांनी मुंडण केले.पहाटेपासूनच किनारपट्टीवरील चिंचणी, वरोर, वाढवण, धाकटी डहाणू, बाडापोखरण, तडियाळे, डहाणू, झाईपर्यंतच्या गावांत मच्छीमार्केट, मच्छी खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आली होती. सर्वच गावांत बंदराला विराेध करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून मानवी साखळी उभारली होती. धाकटी डहाणू येथे मच्छीमारी बोटीही समुद्रात गेल्या नाहीत, तर वाढवण-टिघरेपाडा येथील मुंडेश्वरी देवालयासमोर शेकडो लोक रस्त्यावर उतरून त्यांनी बंदर उभारणाऱ्या जेएनपीटीचा अंत्यविधी करून निषेध केला. तसेच बाळकृष्ण पाटील, कमलेश किणी, सुनील राऊत आणि भुवनेश्वर पाटील यांनी मुंडण करून जेएनपीटीचे प्रतीकात्मक पिंडदान केले. याचवेळी येथील लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळी करून उत्स्फूर्तपणे केलेले आंदोलन यशस्वी केले. या वेळी बंदरविराेधी आंदाेलनातून माघार न घेण्याची शपथही देवीसमोर घेण्यात आली. विनाशकारी वाढवण बंदरामुळे आमचा मासेमारी व्यवसाय संपुष्टात येईल. शिवाय हिरवाईने नटलेला हा परिसर बेचिराख होईल. त्यामुळे वाढवण बंदर नकोच.- नंदू विंदे, अध्यक्ष, धाकटी डहाणू मच्छीमार सोसायटीआंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी रिक्षा वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती.