शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू उपकोषागारातील वीज, नेटच्या लपंडावाने कर्मचारी, नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:04 IST

डहाणूत ५४ सरकारी कार्यालयासाठी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेले उपकोषागार कार्यालय तुटपुंज्या जागेत चालविले जात असून, तेथे नेहमीच लाईट आणि इंटरनेटचा लपंडाव असल्याने त्यात कोणत्याही सरकारी कार्यालयाची बिले वेळेवर मंजूर होत नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह नागरीकांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागते आहे.

डहाणू : डहाणूत ५४ सरकारी कार्यालयासाठी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेले उपकोषागार कार्यालय तुटपुंज्या जागेत चालविले जात असून, तेथे नेहमीच लाईट आणि इंटरनेटचा लपंडाव असल्याने त्यात कोणत्याही सरकारी कार्यालयाची बिले वेळेवर मंजूर होत नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह नागरीकांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागते आहे.या उपकोषागार कार्यालयातून डहाणू तहसिलदार, प्रांत, आदिवासी प्रकल्प कार्यालय, न्यायालये, उपजिल्हा रुग्णालय, पोलीस ठाणे, डी.वाय.एस.पी, पंचायत समिती, एकात्मिक बालविकास प्रकल्प, ९ वस्तीगृहे, अनुदानित आश्रम शाळा, विद्यार्थी शिष्यवृत्ती, वनखाते, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा ५४ कार्यालयाचा आर्थिक व्यवहार होत असतो. येथे वेगवेगळ्या प्रकारची बिले मंजूर करण्यांत येतात. या ठिकाणी जागा अपुरी असल्याने मंजुरीसाठी आलेल्या बिलांचे ढीग पडलेले असतात, या कार्यालयात केवळ एक अधिकारी आणि दोन कर्मचारी कार्यरत आहेत.येथे नेहमीच लाईट आणि इंटरनेटचा लपंडाव सुरू असतो तर लाईट आणि नेट नसणे हे नित्याचेच झाल्याने वेळेत बिले मंजूर होत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, पोषण आहार, कर्मचाºयांचे पगार, कार्यालयाचे आर्थिक व्यवहार विलंबाने होत असल्याने कर्मचाºयांना आणि अधिकाºयांना व नागरीकांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागत आहे. या अडचणींवर मात करून बिले लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी कोषागारातील कर्मचारी ती खाजगी सायबर कॅफेमध्ये नेऊन पास करतात, त्याचा खर्च खिशातून करतात. शिवाय याच कोषागारातून सरकारी स्टॅम्प पेपर आणि स्टँपची विक्री होत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते, म्हणून या कोषागारात विनाविलंब जनरेटर किंवा इन्व्हर्टर बसविण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :electricityवीज