शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

डहाणू रेल्वे स्थानकातील सोयीसुविधांचे लोकार्पण

By admin | Updated: February 5, 2017 02:19 IST

डहाणू रेल्वे स्थानकात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले सुशोभिकरण आणि नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्यातील सोयी सुविधांचे शुक्रवारी डहाणू रेल्वे स्थानकात

डहाणू : डहाणू रेल्वे स्थानकात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले सुशोभिकरण आणि नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्यातील सोयी सुविधांचे शुक्रवारी डहाणू रेल्वे स्थानकात पुरक सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन रेल्वेचे महाप्रबंधक जी.सी अग्रवाल यांच्या हस्ते पार पडले. तसेच महाप्रबंधकाच्या हस्ते रेल्वे स्थानकातील कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. दरम्यान प्रथम श्रेणी प्रतिक्षालय, सुलभ शौचालय याचेही उदघाटन करु न लोकार्पण करण्यात आले. या वेळी डहाणू रेल्वे स्थानकातील नियोजित कार्यक्र माची वेळ ४:५५ ची होती. मात्र महाप्रबंधकाना तीन तास उशिर झाला. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी विविध मागण्या आणि तक्रारी त्यांना सांगण्यासाठी दुपारपासूनच हजेरी लावली होती. मात्र वापी, बलसाड या रेल्वे स्थानकात उशीर झाल्याने त्यांना विलंब झाला. यावेळी मंडल रेल प्रबंधक मुकुल जैन, पश्चिम रेल्वेचे मुख्य इंजिनियर प्रविणकुमार मिश्रा, तसेच बलसाड ते मुंबई दरम्यानचे शेकडो अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे महाप्रबंधकांना निवेदनबोर्डी : पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक जी. सी. अग्रवाल यांनी शुक्र वार, ३ फेब्रुवारी रोजी विरार ते सुरत यादरम्यानच्या रेल्वे स्थानकांचे इन्स्पेक्शन केले. या दरम्यान विविध रेल्वे वसाहती व नवीन प्रकल्प, स्थानकावरील सुविधा आदींची पाहणी केली. या वेळी त्यांनी रेल्वे प्रवासी संघटनांशी संवाद साधला. वेस्टर्न रेल्वे ट्रॅकमेंटेनर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भोईर यांनी मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. कर्तव्य बजावत असतांना उघड्यावर जेवावे लागणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, शौचालयांची कमतरता अशा समस्यांचा समावेश त्यात होता. योग्यतेनुसार रेल्वेच्या विभागीय परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करणे, पगारात ३० टक्के हार्डड्यूटी रिस्क अलाउन्स देणे या प्रमुख मागण्या आहेत.तर जीडीसीई नुसार रेल्वे भर्तीच्या वेळी बोर्डाच्या आदेशाप्रमाणे ५० टक्के कोटा लागू करणे, विविध भत्ते देणे, रेल्वे फाटकांवर तैनात गेटमनच्या कामाच्या शिफ्टचे आठ तास निश्चित करणे, चार तासांचा ओव्हर टाईम देणे, गेट केबिन मध्ये पाणी व शौचालायची सुविधा पुरविणे, रात्रीच्या गस्तीसाठी दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक तसेच त्यांच्या कार्यक्षेत्राचे अंतर कमी करणे, किमॅनच्या सोबतीला ट्रॅकमॅन पाठविणे आदि मुद्यांचा त्या मध्ये समावेश आहे.