शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

एकाच व्यक्तीला दोन विभिन्न जातीचे दाखले : डहाणूचे नगरसेवक गोहिल यांचे पद धोक्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 03:39 IST

नगरपरिषदेचे आरोग्यसभापती निमिल गोहिल यांनी मुदतीत जात पडताळणी वैध प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

- शौकत शेखडहाणू : नगरपरिषदेचे आरोग्यसभापती निमिल गोहिल यांनी मुदतीत जात पडताळणी वैध प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.विद्यमान नगरसेवक निमिल गोहील यांनी निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना विमुक्त जातीचे जात प्रमाणपत्र सादर केले होते. ह्या जात प्रमाणपत्रामध्ये त्यांची जात हिंदू - सलाट (विमुक्त जाती जमाती) अशी नमूद केले आहे. दरम्यान निमिल गोहील यांनी जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या पुराव्यांमध्ये निमिल यांच्या वडिलांची जात हिंदू- कढिया अशी नमूद आहे. ही जात इतर मागास वर्गामध्ये मोडते. त्यामुळे जात पडताळणी समितीने निमिल यांचे प्रमाणपत्र रोखून धरले.निमिल गोहिल यांचे आणि त्यांच्या वडिलांच्या जातीमधील तफावतीचा आधार घेत समितीने आक्षेप घेतला आहे. साहजिकच ह्या त्रुटीमुळे निमिल यांना मुदतीत जात पडताळणी पत्र प्राप्त करता आलेले नाही. दरम्यान ६ महीन्यांची मुदत संपल्यामुळे डहाणू नगरपालिका प्रशासनाने निमिल यांना २८ जून रोजी नोटीस देखील बजावली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्राचा मुद्दयावर लक्ष्य करुन विरोधकांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे. यामुळे डहाणूच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे.निमिल हे डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणूकीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या प्रभाग ६ अ मधून निवडून आले होते. त्यांना नियमानुसार ६ महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. ही मुदत संपल्याने त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. याला ते कसे सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर माझ्या जात प्रमाणपत्राबाबतीत केलेले आरोप खोडसाळपणे केले असून त्यात काहीच तथ्य नाही. तक्रारदाराकडे तसे काहीच पुरावे नसल्याचे सांगून त्यांनी या आरोपाचे खंडन केले आहे.त्यांना नगर परिषदेने जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस दिल्यानंतर विरोधकांनी याकडे त्यांना अडचणीत आणण्याची संधी म्हणून पाहीले आहे. उमेदवारी अर्ज सादर करतांना शपथपत्रामध्ये ६ महीन्याच्या आत जातपडताळणी वैध प्रमाणपत्र देणे आवश्यक असताना ते सादर करण्यात न आल्याने राष्ट्रवादीने व्यक्ती एक सर्टीफिकेट दोन या मु्द्याचे भांडवल करुन त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे. आता त्यांच्याकडून पराभूत झालेले उमेदवार शशिकांत बारी यांनी देखील वकील मोहन वंजारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांचेकडे त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. गोहिल यांनी त्यांचे विमुक्त जातीचे प्रमाणपत्र अमान्य झाल्यानंतर त्वरीत उप विभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करुन इतर मागासवर्गीय असल्याचे नवे प्रमाणपत्र मिळवून ते जात पडताळणी समितीकडे सादर केले आहे.माझी जात विमुक्त जातीमध्ये समाविष्ट नसून इतर मागासवर्गीयांत समाविष्ट आहे असे जात पडताळणी समितीने कळविल्यामुळे मी नव्याने इतर मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र मिळवून ते समितीकडे सादर केले आहे. या आधी मला चुकीचे प्रमाणपत्र दिले गेले, यात माझा काहीही दोष नाही. नवे प्रमाणपत्र मिळाले की मी ते सादर करेन.- निमिल गोहिल, विद्यमान नगरसेवक

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या