शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाला दोन मुलांसह अटक व सुटका

By admin | Updated: July 10, 2016 00:23 IST

एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला केल्याप्रकरणी वसई विरार पालिकेतील बहुजन विकास आघाडीच्या नगसेवकाला त्याच दोन मुलांसह तुळींज पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक

वसई : एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला केल्याप्रकरणी वसई विरार पालिकेतील बहुजन विकास आघाडीच्या नगसेवकाला त्याच दोन मुलांसह तुळींज पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली असून त्याना शनिवारी जामिन मंजूर करण्यात आला. प्रभाग क्रमांक ७१ चे नगरसेवक सिताराम गुप्तांवर तुळींज पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे. याआधी त्यांचवर ८ गुन्हे दाखल होते. नगरसेवक सीताराम सुदामा गुप्ता यांच्यावर नालासोपारा आणि तुळींज पोलीस स्टेशनमध्ये तब्बल ८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले होते. त्यात काल रात्री आणखी एका गुन्ह्याची भर पडली. नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथे राहणारे बांधकाम व्यवसायिक जगदीश दुबे (४९) यांनी नगरसेवक सिताराम गुप्ता आणि त्यांची मुले अनिल सिताराम गुप्ता, अरविंद सिताराम गुप्ता यांना २०१० मध्ये वाणगाव हायवेवरील मौजे गोवणे गावातील जमीन विकली होती. या व्यवहारात २० लाख रुपये जगदीश दुबे यांना गुप्ता परिवाराने दिले होते व उरलेली रक्कम थोडी थोडी करून देणार असे सांगितले होते. व्यवहार पूर्ण न झाल्याने वकीलातर्फे जगदीश दुबे यांनी व्यवहार स्थगित झाला म्हणून नोटीस पाठवली होती. पण जगदीश दुबे यांनी गुप्ता परिवाराकडून जागेसाठी घेतलेले २० लाख रुपये सौदा स्थगित होऊनसुद्धा परत न दिल्याने गेल्या काही दिवसापासून वाद सुरू होते.गुप्ता यांनी या आधी साधारण सात आठ महिन्यांपूर्वी नालासोपाऱ्यात अनाधिकृत हॉस्पिटल सुरु केले होते. त्याविरोधात तक्रारी आल्यानंतर वसई-विरार महानगरपालिकेने त्या हॉस्पिटल ला टाळे ठोकून कारवाई केली होती. (प्रतिनिधी)पैसे परत न केल्याचा रागवीस लाख रुपये परत न दिल्याचा राग मनात धरून शुक्रवारी गुप्ता यांनी आपल्या दोन मुलांसह दुबे यांचे अपहरण केले. दुपारी २ च्या सुमारास पडघा येथे कामानिमित्त बाईकवर जगदीश दुबे गेले होते.त्यांना खडवली येथे रस्त्यात अडवून मारहाण, शिवीगाळ करत अनिल गुप्ता आणि अरविंद गुप्ता यांनी त्यांच्या स्वत:च्या इनोव्हा कारमध्ये जबरदस्तीने बसवून नालासोपारा संतोष भवन येथील सिताराम गुप्ता याच्या कार्यालयात घेऊन आले. याठिकाणी दुबे यांचा मुलगा कौशल दुबे याला कार्यालयात बोलावून दुकान आणि फ्लॅटचे कागदपत्रे आणून आमच्या नावावर कर असा दम देत आज नाही केले तर संपूर्ण परिवार संपवून टाकेन अशी धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. दुबे यांनी गुप्ता यांच तावडीतून सुटका करून तेथून पळ काढत तुळींज पोलीस स्टेशन गाठले. दुबे यांच्या तक्रारीनंतर गुप्तांसह त्यांच दोन मुलांवर अपहरण, मारहाण, शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.