शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेत पाण्याची ओरड

By admin | Updated: December 10, 2015 01:50 IST

शहराच्या पूर्व भागात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांना भेडसावत आहेत. नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेवकांकडे दाद मागितली आहे

कल्याण : शहराच्या पूर्व भागात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांना भेडसावत आहेत. नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेवकांकडे दाद मागितली आहे. पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी संतप्त शिवसेना नगरसेवकांनी महापौरांकडे धाव घेतली. महापौर, नगरसेवक व पाणी पुरवठा अभियंता यांच्या एक बैठक पार पडली. त्यानंतर पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याचे ठरले आहे. तोडगा निघालाच तर पूर्वेतील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. अन्यथा कल्याण पूर्वेतील पाणी प्रश्न हा तसाच कायम राहून नागरिकांची पाण्याविना फरपट होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शहराच्या पूर्वेला पाण्याचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून आहे. पूर्व भाग हा उंच सखल आहे. भौगोलिक स्थिती पाणी पुरवठयासाठी अनूकूल नाही. नागरीकांनी मोर्चे काढले. आंदोलने केली आहेत. रस्त्यावर उतरून हा प्रश्न विधीमंडळापर्यंत चर्चेला नेऊन देखील प्रश्न सुटण्याऐवजी जैसे थे आहे. पाणी कमी दाबाने येते.त्याचबरोबर काही ठिकाणी पाण्यात किडे आढळले. याबाबत तक्रार करूनही त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. १शिवसेना नगरसेवक स्नेहल पिंगळे, निलेश शिंदे, माधुरी काळे, राजाराम पावशे, शितल भंडारी यांनी त्यांच्या प्रभागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. शनिनगर, आनंदवाडी, विजयनगर याठिकाणी पाण्याची तीव्र समस्या नागरीकांना सतावत आहे. महापालिकेने पाणीपुरवठा योजना राबविल्यावर कल्याण पूर्वेला ६० दशलक्ष लिटर पाणी देण्याचे मान्य केले होते. आजमितीस पाणी टंचाईचे कारण पुढे करुन ३५ दशलक्ष लिटरच पाणी पुरविले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. पाणी टंचाईसाठी संप, विजेअभावी पंप बंद आहे. २नदीच्या पाण्याची पातळी खाली गेली अशी कारणे सांगितली जातात. ही कारणे कल्याण पूर्वेसाठी असतील तर कल्याण पश्चिम व डोंबिवली शहरासाठी का लागू होत नाही. त्याठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत असतो. याचाच अर्थ कल्याण पूर्वेला दुजाभावाची वागणूक महापालिका प्रशासनाकडून दिली जात आहे. ३महापालिकेची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली नव्हती. महापालिका औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून होती. त्यावेळी तत्कालीन महापौर वैजयंती घोलप यांनी १० दशलक्ष लिटरचा वाढीव पाणी पुरवठा कल्याण पूर्वेला करण्यासाठी ठराव केला होता. मात्र त्याला महामंडळाने हिरवा कंदील दिला नाही. त्यामुळे तो ठराव कागदावर राहिला. घोलप यांनी महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी पोलिसांच्या लाठीहल्ल्यात त्या जखमी झाल्या होत्या. तसेच तत्कालीन मनसे नगरसेवक नरेंद्र गुप्ते यांनी महामंडळाच्या कार्यालयातील खूर्ची कार्यालयाबाहेर फेकून दिली होती. नगरसेवक निलेश शिंदे यांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले होते.