शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वन जमिनीवरील रस्ता क्रशर मालकाच्या दावणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 03:02 IST

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील पोळे ग्रामपंचायतीच्या परिसरातील गुरु ब्रदर्स कंपनीच्या क्रशर मालकाची तळी उचलल्याचा प्रकार केला आहे.

- आरिफ पटेलमनोर : वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील पोळे ग्रामपंचायतीच्या परिसरातील गुरु ब्रदर्स कंपनीच्या क्रशर मालकाची तळी उचलल्याचा प्रकार केला आहे. वन हद्दीतील झाले तोडून अनधिकृत रस्ता बनविल्या प्रकरणी नुकतीच त्याच्यावर तात्पूरती दंडात्मक कारवाई करुन सोडले होते. मिळालेल्या माहिती नुसार वनखात्याच्या कर्मचाºयांनी वरिष्ठांची दिशाभूल करुन क्र शर असणाºया ठिकाणी मागच्या बाजूला गाव असल्याचा रिपोर्ट केला आहे. वास्तविक तसे नसुन संगनमताने सुरु असलेला भ्रष्टाचार आहे.पोळे ग्रामपंचायत परिसरातील वनातील झाडे तोडून केलेल्या कच्चा रस्त्यावरुन खडीची ने आण करणाºया आयवा डंपरची ये जा असते. ही क्रशर मशीन मनोर वन क्षेत्रपाल यांच्या हद्दीमध्ये आहे. या डंपरच्या धुमधडाक्यामुळे येथील वनसंपदा नष्ट झाली असून वन खात्याचे अधिकारी विषय सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पकडलेले दोन डंपर चार-पाच दिवसानंतर सहायक उप वन संरक्षक डी. जे. पवार यांनी आपल्या प्राधिकृत अधिकारामध्ये दंडात्मक कारवाई करुन सोडेले होते.वास्तविक, संरक्षित वनातील संपदा नष्ट करुन अनधिकृत रित्या तयार केलेला रस्ता त्यांनी बंद न केल्याने केलेली कारवाई फार्स ठरला आहे. त्यामुळे आयवा डंपरची ये-जा बिनदिक्कत सुरु आहे. आपल्या रिपोर्टद्वारे वरिष्ठाची दिशाभूल करणाºया वन अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या बाबत उप वन संरक्षक एन. एस. लडकत यांच्याशी संपर्क साधला असता. सदर क्रशर मशीनच्या मागे गाव असल्याने लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता ठेवला अशी माहिती मिळाली. दरम्यान, त्या भागामध्ये कोणतेही गाव नसल्याने ही दिशाभूल अथवा क्रशर मालकाची पाठराखण ठरत आहे.>पोळे गावचे सरपंच काय म्हणतात?पोळ ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण सदू सुतार म्हणाले की, परिसरातील गुरु ब्रदर्स या क्रशर कंपनीकडे जाणारा रस्ता वन जमिनीतून गेला आहे. क्रेशरच्या मागे माळकरी पाडा आहे. मात्र, क्रशरचे डंपर धावतात त्या रस्त्याशी पाड्याचा काही संबध नाही. पाड्यासाठी मनोर-विक्र मगड मुख्य रस्त्यावरून मार्ग आहे. मिळालेल्या माहिती नुसार सहाय्यक उप वन संरक्षक पवार यांनी लडकत साहेबांची दिशाभूल केली आहे. मी प्राधिकृत अधिकारी असल्याना माझ्या अधिकारात मला दंड आकारणी करुन डंपर किंवा कोणतेही वाहन सोडण्याचा अधिकार आहे.- डी. जे. पवार, सहाय्यकउप वन संरक्षक