शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये पाण्यासाठी टॅंकरवर झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 00:18 IST

पूर्व परिसरात पाणीसमस्या गंभीर : चार दिवसांआड पाणी येत असल्यामुळे त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : पूर्वेच्या चंदनसार भाग, कातकरी पाडा आणि जीवदानी पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टी भागात आता चार दिवसाआड पाणी येत असून, यामुळे येथील पाणी समस्या गंभीर बनत चालली आहे. याविरोधात नागरिक संताप व्यक्त करत असून, त्यांना टँकरचे पाणी मिळविण्यासाठीही मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. टँकर आला की पाणी मिळविण्यासाठी येथील नागरिकांची झुंबड उडत आहे, तर वेळप्रसंगी पाणी विकत आणूनही त्यांना आपली तहान भागवावी लागत आहे.मागील महिन्यापासून विरार पूर्व पट्टीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ४-५ दिवसांनी नळाला पाणी येत असल्यामुळे अधिक पैसे देऊन नागरिकांना टँकर मागवावे लागत आहेत. या पाणीटंचाईचा गैरफायदा पाणी व्यावसायिक व टँकर माफिया घेत आहे. मात्र, पालिकेकडून याविरोधात अद्याप कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.ही पाणीटंचाई कृत्रिम असल्याचा आरोप करत, काही राजकीय पक्षांनी याविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र, कोविडच्या प्रादुर्भावामुळे या आंदोलनांवर पाणी फेरले गेले.मार्च महिन्यातच नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असेल, तर पुढचे दिवस काढायचे कसे, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.दरम्यान, केंद्र शासन पुरस्कत अमृत अभियानांतर्गत ३१० किमी जलवाहिनी अंथरणे व विविध ठिकाणी १८ जलकुंभ बांधणे ही कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. 

महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ४६ हजार नळ जोडण्या देण्यात आल्या असून, त्यांना टप्प्याटप्प्याने जलमापके बसविण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे, शिवाय महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येस पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने खोलसापाडा १ व २ ही धरणे बांधण्याची योजना हाती घेण्यात आलेली आहे. यासह एकूण पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी २३१.९० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित असली, तरी शहरात दिवसेंदिवस वाढणारी पाणीटंचाई गंभीर मानली जात आहे.

महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ४६ हजार नळ जोडण्या देण्यात आल्याचे महापालिका सांगत आहे. मात्र, काही भागांत अजूनही नळ जोडण्या आलेल्या नाहीत. नळ जोडण्यांसाठीची अनामत रक्कम देऊ न शकणाऱ्या काही रहिवाशांना महापालिकेने ही नळजोडणी द्यायला हवी व हे पैसे मासिक बिलातून वजा करावेत.- डॉ. डी.एन. खरे, जिल्हाध्यक्ष, बहुजन समाजवादी पक्ष

टॅग्स :vasai-acवसईVasai Virarवसई विरार