शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेविना नपाची कोटींची उड्डाणे

By admin | Updated: October 24, 2015 00:30 IST

पालघर नगरपरिषदेच्या अंतर्गत २२ कोटींच्या विकासकामांच्या निविदांवर शुक्रवारी कुठलीही साधकबाधक चर्चा न करता सत्ताधारी शिवसेना आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस

पालघर : पालघर नगरपरिषदेच्या अंतर्गत २२ कोटींच्या विकासकामांच्या निविदांवर शुक्रवारी कुठलीही साधकबाधक चर्चा न करता सत्ताधारी शिवसेना आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी अवघ्या १५ मिनिटांत मंजुरी दिली. या निविदेसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी असून टक्केवारीच्या गर्तेत सापडलेल्या या निविदेच्या मंजुरीसाठी आचारसंहितेचे नाव पुढे केले जात आहे.पालघर नगरपालिकेने सात प्रभागांमध्ये रस्ते, स्मशानभूमी इ. २२ कोटींच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. या कामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमासह प्रशासकीय, तांत्रिक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत निविदा प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी सेनेचे गटनेते उत्तम पिंपळे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे करून सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर दिला होता. परंतु, गटनेते व जिल्हाप्रमुख पिंपळे यांच्याविरोधात फळी सक्रिय होत त्यांनी विरोधी पक्षालाही विकासकामांच्या मुद्यावर आपल्या बाजूला वळवून सकाळी ११.३० वा.च्या दरम्यान झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व कामांना अवघ्या १५ मिनिटांत मंजुरी देण्यात यश मिळविले.नगराध्यक्षा प्रियंका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये २२ कोटींच्या कामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. या वेळी पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेचे नाव पुढे करण्यात आले. मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्या जबाबदारीने निविदा काढल्यानंतर उपस्थित नगरसेवकांनी कोणताही आक्षेप न घेता सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस नगरसेवकांच्या संमतीने निविदेला मंजुरी देण्यात आली. या वेळी सेनेचे गटनेते उत्तम पिंपळे हे सभेला गैरहजर राहिले. अशा वेळी सेनेच्या नगरसेवकांनी विरोध करू नये म्हणून जिल्हा संपर्कप्रमुख केतन पाटील यांनी नगराध्यक्ष दालनात डेरा टाकला होता. या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या निविदा प्रक्रियेला विरोध केल्याने गटनेते व जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांच्याकडून गटनेतेपदाची जबाबदारी काढून घेण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून माजी नगराध्यक्षा अंजली पाटील यांच्याकडे गटनेतेपद सोपविण्यात येणार असल्याचे कळते, तर विकासकामांना आमचा विरोध नसल्याची भूमिका राष्ट्रवादी व काँग्रेसने घेतली असून टक्केवारीच्या गर्तेत अडकलेल्या या निविदा प्रक्रियेची मोठी चर्चा सर्वत्र रंगत आहे. (वार्ताहर)