शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय साहित्याच्या खरेदीत करोडोंचा घपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:05 IST

आयुक्तांचे कानावर हात : चोरघे यांचा आरोप

नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी मोठ्या तरतूदी महानगरपालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून करवून घेत असून मागील पाच वर्षांसाठी १५ कोटी १ लाख ६ हजारांचे साहित्य रुग्णांसाठी खरेदी केले, पण १० कोटी १५ लाख ९८ हजारांचे कोणते इतर साहित्य खरेदी केले असून ते कुठे आहे? हे मात्र गुलदस्त्यात आहे. या खरेदीमध्ये काळा बाजार झाला असून इतर खरेदी केलेले साहित्य व त्यांचे पैसे कोणाच्या घशात गेले असा घणाघाती आरोप राजकुमार चोरघे यांनी केला आहे. वसई विरार महानगरपालिकेकडून आरोग्य विभागाने रुग्णालयात लागणाऱ्या इतर साहित्य खरेदीसाठी केलेला करोडो रु पयांचा खर्च संशयाच्या भोवºयात आला असल्याने पुन्हा एकदा महानगरपालिकेत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात वसई येथील सर डी.एम.पेटिट रुग्णालय, नालासोपारा येथील नगीनदास पाडा येथील रुग्णालय, नालासोपारा व सातीवली येथील माता बाल संगोपन केंद्र आणि इतर आठ दवाखान्यामार्फत आरोग्य सेवा चालते. वैद्यकीय आरोग्य विभागाने मागील पाच वर्षात १) रुग्णालय विद्युत जनित्र देखभाल यासाठी १७ लाख ३९ हजार, २) रुग्णालय वातानुकूलीत यंत्रणा दुरुस्तीसाठी ६ लाख ८१ हजार, ३) रुग्णालय स्टेशनरी छपाईसाठी ७६ लाख ८० हजार, ४) रु ग्णालय स्टेशनरी खरेदीसाठी ३१ लाख ६७ हजार, ५) रुग्णालय ध्वनी प्रक्षेपण दुरुस्तीसाठी २० हजार, ६) रुग्णालय इन्व्हर्टर दुरुस्तीसाठी ४० हजार, ७) रुग्णालय किरकोळ खर्चासाठी ८ लाख २१ हजार, ८) रुग्णालय विद्युत जनित्र डिझेल खर्चासाठी २२ लाख ६१ हजार, ९) रुग्णालयीन उपकरणे देखभाल दुरुस्तीसाठी ९ कोटी ८० लाख २४ हजार, १०) रु ग्णांसाठी कपडे, चादरी, खरेदीसाठी सव्वा कोटी ११) रु ग्णांना भोजन, चहापान व अल्पोपहारासाठी २ कोटी ३२ लाख २३ हजार असे एकूण १५ कोटी १ लाख ६ हजार एवढे पैसे खर्च केलेले असतानाही मग १० कोटी १५ लाख ९८ हजार रु पयांचे इतर कोणते साहित्य खरेदी केले असा प्रश्न विचारला असून तिजोरीची लूट करून सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.आरोग्य विभागात ही हातचलाखी कोण करत आहे, याचा गोल्डन ठेकेदार कोण आहे, याचे लाभार्थी कोण आहे असे अनेक प्रश्न महानगरपालिकेला विचारत आरोपकर्त्याने चौकशीची मागणीही केली असून असे खोटे लेखाशीर्ष अर्थसंकल्पनातून काढून टाकण्याची विनंती केली आहे.वसई विरार मनपाच्या आरोग्य विभागाने खोट्या लेखाशीर्षमधून लूटमार कशी करता येईल याचे उत्तम उदाहरण देऊन कायदा पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने काम करण्याची कार्यपद्धती अनेक महिन्यापासून सुरू असल्याचेही सांगितले आहे. 

वैद्यकीय आरोग्य विभागाने ५ वर्षांमध्ये १५ कोटी १ लाख ६ हजारांची साहित्य खर्च केले होते. मग १० कोटी १५ लाख ९८ हजारांचे इतर कोणते साहित्य खरेदी केले व खरेदी केलेले इतर साहित्य कुठे आहे? यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. आयुक्तांनी जातीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी.- राजकुमार चोरघे, आरोपकर्तेआरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नेमके यात काय झाले आहे? हे त्यांना विचारावे ते तुम्हाला सांगतील.- बळीराम पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिकाफेब्रुवारी २०१९ ला आरोग्य विभागाचा पदभार घेतला असून मागील पाच वर्षात काय झाले, या प्रकरणाची मी चौकशी करून नेमका घोटाळा किंवा भ्रष्टाचार झाला आहे का याचा तपास करते. प्रसिद्धीसाठी कोणीही बातमी किंवा माहिती देतांना संबंधित प्रकरणाची योग्य ती माहिती घ्यावी.- तबसुम काझी, आरोग्य अधिकारी