शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

पालघरात गुन्हे वाढले

By admin | Updated: December 28, 2015 02:08 IST

नव्यानेच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढला असल्याचे गेल्या चार वर्षातील आकडेवारी दर्शवित असून गुन्ह्यांची उकल करण्याची जिल्हा पोलिसांची टक्केवारी ही ९७ टक्के आहे.

पालघर : नव्यानेच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढला असल्याचे गेल्या चार वर्षातील आकडेवारी दर्शवित असून गुन्ह्यांची उकल करण्याची जिल्हा पोलिसांची टक्केवारी ही ९७ टक्के आहे. २०११ ते २०१४ अशा चार वर्षांची आणि २०१५ च्या मार्च पर्यंतच्या आकडेवारीची तुलना केली तर खूनाचे प्रमाण थोड्याफार फरकाने सारखेच आहे. २०११ मध्ये ७९ खून झाले होते. १२ मध्ये ९४, १३ मध्ये ९१, १४ मध्ये ८५ असे प्रमाण होते. त्यांची उकल करण्याचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यां दरम्यान होते. चालू वर्षाच्या पहिल्या त्रैमासिकात खूनाचे प्रमाण १९ होते. त्यातील १५ प्रकरणांचा तपास लागला आहे. खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हेही १२ झाले आहेत. दरवड्याच्या गुन्ह्यांत मात्र गेल्या चार वर्षांत वाढ झाली आहे. २०११ मध्ये १४१ असलेले दरोडे २०१४ मध्ये २०९ वर गेले होते. त्यांच्या उकलीचे सरासरी प्रमाण हे ३५ ते ८१ टक्क्यांच्या दरम्यान होते. विशेष म्हणजे २०११ आणि १२ या वर्षात या परीसरात चेन स्नॅचिंगचा एकही गुन्हा नोंदविला गेला नव्हता. परंतु २०१३ मध्ये १४७ तर २०१४ मध्ये १२३ आणि २०१५ च्या प्रारंभीच्या तीन महिन्यात १६ असे त्यांचे प्रमाण होते. घरफोड्यांचे प्रमाण मात्र गेल्या चार वर्षांत वाढले आहे. २०११ मध्ये असलेल्या ६४८ घरफोड्या, चोऱ्या २०१२ मध्ये ७४६, २०१३ मध्ये ९३८, २०१४ मध्ये १०७१ व या वर्षाच्या तीन महिन्यात त्या २४८ झाल्यात. वाहनचोऱ्या मात्र सातत्याने वाढत आहेत. २०११ मध्ये अवघ्या २० असलेल्या वाहनचोऱ्या गतवर्षी ४५६ झाल्या तर या वर्षाच्या प्रारंभीच्या त्रैमासिकात १२० झाल्या दंगलीचे गुन्हे ही या चारही वर्षांत वाढतच गेले आहे. २०११ मध्ये १८०, २०१२ मध्ये २००, २०१३ मध्ये १८६, २०१४ मध्ये २१६ तर चालू वर्षाच्या त्रैमासिकात ५२ असे प्रमाण आहे. बलात्कारातही वाढ होत आहे. (प्रतिनिधी)