शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे

By admin | Updated: April 26, 2017 23:32 IST

अवैध रित्या सावकारी करणाऱ्या बोईसर येथील दोन सावकाराच्या कार्यालयावर पालघर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत ह्यांनी धाड घालून त्यांच्या विरोधात बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केले आहेत.

पालघर/बोईसर : अवैध रित्या सावकारी करणाऱ्या बोईसर येथील दोन सावकाराच्या कार्यालयावर पालघर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत ह्यांनी धाड घालून त्यांच्या विरोधात बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केले आहेत.राज्यात सावकारांच्या कर्जाच्या ओङया खाली दबून शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत असल्याच्या घटना वाढीस लागल्याने केंद्र शासनाने राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँका मार्फत पतपुरवठ्या संदर्भात विविध योजना जाहीर केल्या असून लोकांनी शक्यतो राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था मार्फत कर्ज घ्यावे असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे बँकांचा कडून कर्ज घेणे शक्य न झाल्यास परवानाधारक सावकारा कडून तारण व बिनतारण कर्ज पर्याय शासन नियमानुसार उपलब्ध करून देण्यात आले आहे.बोईसर मध्ये बेकायदेशीररित्या भरमसाठ व्याज आकारून काही लोक गरजवंत लोकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याची तक्रार राजेश बंडू येवले यांनी मुख्यमंत्र्यांच्या पोर्टल वर केली होती. ती तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर उपनिबांधक राऊत यांच्या नेतृत्वा खाली तालुका उपनिबांधक सुरेश अंधारे, सहनिबंधक वाडा विजय पाटील, मुख्य लिपिक भरत वेखंडे,ई. सह दोन पंचाच्या टीमने बोईसर येथे अवैध सावकारी करणाऱ्या चंद्रसेन कोहिल(प्रभात टेलर्स), व समिर उत्तमलाल शहा (श्री विनायक केमिकल) यांच्या कार्यालयावर धाड घातली. या धाडीत अवैध रित्या सावकारी करीत असल्या बाबत दस्तावेज,कोरे धनादेश, मूल्यवान रोखे, गुप्त व्यवहारा संबंधी लिखाण केलेल्या डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.फिर्यादी म्हणून सुरेश अंधारे यांनी तक्रार दिल्यानंतर महाराष्ट्र सहकारी नियमन अधिनियम २०१४ च्या कलम ३८ अन्वये बोईसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी व्यवसाय बोकाळला असून बोईसर मधील या कारवाईनंतर अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.